
कोल्हापूर – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या ‘श्री महालक्ष्मीदेवी देवस्थान विकास परिसरा’च्या अंतर्गत पहिल्या टप्प्यातील कामास प्रारंभ करण्यात आला आहे. यात भूसंपादन होणार्या आणि बाधित होणार्या १३९ मिळकतींचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या मिळकतींचे मूल्यांकन करण्याचे काम चालू असून त्याचा अहवाल लवकरच प्रशासनास सादर करण्यात येणार आहे. महसूल, महापालिका, नगर भूमापन कर्मचारी अशा कर्मचार्यांचा समावेश असलेल्या ३ पथकांकडून ८ दिवसांत हे सर्वेक्षण करण्यात आले. संपादित केल्या जाणार्या मूल्यांकनासाठी करवीर प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !