धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम !

पुणे – जर मुसलमान लव्ह जिहाद करत असतील, तर हिंदूंनी त्याला ‘बाजीराव-मस्तानी’ने उत्तर दिले पाहिजे. जो हिंदु मस्तानीला घरी आणेल, त्याला मी १ लाख रुपये रोख आणि चांदीचे कडे बक्षीस देईन, असे विधान ‘समस्त हिंदु आघाडी’चे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केले आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मिलिंद एकबोटे यांच्या हस्ते मूर्तीचा अभिषेक आणि शंभू महापूजा करण्यात आली. या वेळी उपस्थितांना संबोधित करतांना त्यांनी मुसलमान समुदायावर ‘लव्ह जिहाद’चा आरोप करत हिंदूंना ‘बाजीराव-मस्तानी’चा मार्ग अवलंबण्याचे आवाहन केले.
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !