शिकण्याची वृत्ती आणि नामजपाची आवड असलेली ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची पुणे येथील कु. मृणाल नीलेश जोशी (वय १४ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. मृणाल नीलेश जोशी ही या पिढीतील एक आहे !


‘वर्ष २०२३ मध्ये ‘कु. मृणाल नीलेश जोशी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५४ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२६ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५६ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (४.५.२०२६)

 

कु. मृणाल नीलेश जोशी हिची तिच्या कुटुंबियांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. मृणाल नीलेश जोशी

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ - सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. श्री. नीलेश अच्युत जोशी (कु. मृणालचे वडील), कोथरूड, पुणे

१ अ. सेवेची तळमळ : ‘कु. मृणाल ‘युवा साधना सत्संगा’त ‘ऑनलाईन’ सहभागी झाल्यापासून तिची सेवेची तळमळ वाढली आहे. कोथरूड येथे गजानन महाराज प्रगटदिनाच्या निमित्त लावलेल्या ग्रंथ प्रदर्शनाच्या ठिकाणी तिने स्वतःहून सेवा केली. तिने महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदर्शनकक्षावर सेवा केली. त्या वेळी मृणाल जिज्ञासूंना उत्स्फूर्तपणे सात्त्विक उत्पादनांचे महत्त्व सांगत होती. प्रदर्शनकक्षाची सेवा पूर्ण झाल्यावर तिने सत्संगात तिला शिकायला मिळालेली सूत्रे आणि तिच्या लक्षात आलेल्या चुका सांगितल्या.’

२. सौ. प्रीती जोशी (कु. मृणालची आई), कोथरूड, पुणे

२ अ. परिस्थिती स्वीकारणे : ‘वर्ष २०२१ मध्ये आम्ही पुणे येथून लांजा, जिल्हा रत्नागिरी येथे स्थलांतरित झालो होतो. तेथे गेल्यानंतर कु. मृणालने रहाणीमानातील आणि तिच्या शैक्षणिक जीवनातील पालट सहजतेने स्वीकारला.

२ आ. सेवाभाव : वर्ष २०२३ मध्ये माझ्या सासूबाईंचे (श्रीमती शुभदा जोशी यांचे) निधन झाले. त्या निधनापूर्वी ७ – ८ मास रुग्णाईत होत्या. तेव्हा मृणालने आजीची सेवा मनापासून केली. ती आजीला हवे-नको ते सर्व पहात होती.

२ इ. योग्य-अयोग्य याची जाणीव : वर्ष २०२५ मध्ये आम्ही पुण्यात रहायला आल्यावर मृणालचे पुण्यातील शाळेत नाव घातले. आम्ही तिला शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनात भाग घेण्याविषयी विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘वर्गात मुला-मुलींना एकमेकांच्या नावावरून चिडवण्याचे प्रमाण पुष्कळ आहे. मला त्यात अडकायचे नाही. त्यामुळे मी स्नेहसंमेलनात सहभाग घेणार नाही.’’ मृणालला ‘योग्य काय आहे ?’, याची जाणीव आहे.

मितभाषी आणि सेवेची तळमळ असलेली पुणे येथील ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. मृणाल जोशी !

पू. (सौ.) मनीषा पाठक

१. ‘कु. मृणाल मितभाषी आणि शांत आहे.

२. ती प्रत्येक कृती व्यवस्थित आणि नीटनेटकेपणाने करते.

३. लांजा येथून पुण्यात आल्यावर ती शिबिर आणि मार्गदर्शन यांत उपस्थित रहाते. तेव्हा ती शांतपणे आणि एकाग्रतेने मार्गदर्शन ऐकते. तिला त्यात काही शंका आल्यास ती नम्रतेने विचारते.

४. मृणाल आणि तिचा मोठा भाऊ श्री. ऋग्वेद जोशी (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय २० वर्षे) यांचे नाते आध्यात्मिक स्तरावर आहे. ते दोघेही एकमेकांना साधना आणि सेवा यांत साहाय्य करतात.

५. ती उपलब्ध वेळेत सेवा करण्याचा प्रयत्न करते. त्यातून तिची सेवेप्रती असलेली तळमळ लक्षात येते.’

– (पू.) सौ. मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत, वय ४४ वर्षे), पुणे (२०.४.२०२६)

२ ई. नामजप करण्याचे गांभीर्य

अ. मृणालला सकाळी उठण्याचे महत्त्व आणि लाभ सांगितल्यावर ती प्रतिदिन पहाटे ५ वाजता उठून नामजप अन् अभ्यास करते.

आ. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।’ हा नामजप करण्याविषयी चौकट प्रसिद्ध झाली होती. तेव्हापासून मृणाल हा नामजप नियमितपणे करते.

२ उ. जिज्ञासू आणि अभ्यासू वृत्ती : ती बाबांना व्यष्टी साधनेच्या संदर्भात शंका विचारते. ती बाबांकडून तिच्या अभ्यासातील प्रश्नांचे निरसन करून घेते.’

३. श्री. ऋग्वेद जोशी (मृणालचा मोठा भाऊ, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय २० वर्षे)

३ अ. शिकण्याची वृत्ती : ‘माझ्याकडे ध्वनीचित्रफितींचे संकलन करण्याची (व्हिडिओ एडिटिंगची) सेवा असते. माझी सेवा चालू असतांना मृणाल माझ्या समवेत बसते. त्या वेळी ती ‘इमेज पोस्ट’ कशी बनवतात ? त्यात काय बारकावे असतात ?’, याविषयी समजून घेते. आता तिने ‘कॅन्वा’ ही संगणकीय प्रणाली (इमेज आणि व्हिडिओ एडिटिंगचे सॉफ्टवेअर) शिकून घेतली आहे. ती ‘इमेज पोस्ट’ बनवण्याचा सरावही करत आहे. आता ती प्रत्येक रविवारी सनातन संस्थेच्या वतीने होणार्‍या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’त ‘पीपीटी’ (माहिती सादर करण्याची एक संगणकीय पद्धत)’ दाखवण्याची सेवा करते.’

४. स्वभावदोष : मनमोकळेपणाने न बोलणे आणि कामे संथ गतीने करणे.’- सौ. प्रीती जोशी, कोथरूड, पुणे.

(लिखाणातील सर्व सूत्रांचा दिनांक : २०.४.२०२६)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.