द्रमुकच्या उदयनिधी स्टॅलिनने ‘सनातन धर्म नष्ट करण्याविषयी’च्या विधानावर हिंदूंना अंजन घालणारा लेख
१२ मे या दिवशी तमिळनाडू विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून पहिले भाषण करतांना उदयनिधी स्टॅलिनने त्याच्या जुन्या विधानाचाच पुनरुच्चार केला. ‘सनातन धर्म हा नक्कीच नष्ट केला पाहिजे’, असे जे तो म्हणाला, तेच त्याने ‘सनातन निर्मूलन परिषदे’त २०२३मध्ये म्हटले होते. ‘सनातन हा डेंग्यू, मलेरिया आहे; त्यामुळे त्याला नष्ट केलेच पाहिजे’, असे तो म्हणाला होता. ‘आता डेंग्यू, मलेरिया थेट नष्ट करता येत नाही, त्यासाठी तो पसरवणारे डास मारावे लागतात. सनातन नष्ट करण्यासाठी सनातन धर्माचे वाहक, मानणारे मारावे लागतील’, ही थेट चेतावणी होती. त्यामुळे त्याला जे म्हणायचे होते, तो थेट हिंदूंचा नरसंहारच होता; अन्य काहीही नव्हते; पण निर्णय देणार्या न्यायालयास ते तसे काही वाटलेच नाही. ‘तो जे बोलला होता, ते ‘हेट स्पीच’ (द्वेषयुक्त भाषण) आहे आणि त्यासाठी तो दोषी आहे’, हेही आजतागायत न्यायालयाने मान्य केले नाही.

१. राज्यघटनेपासूनच हिंदूंविषयी चुकीचे मत
‘हिंदु म्हणजे सांप्रदायिक, अत्यंत नीच, घाणेरडा, अविकसित, सुधारणा न झालेला किंवा मान्य नसलेला समाज आहे’, हे भारतीय राज्यघटनेचे अलिखित मत आहे. केवळ राज्यघटनेचेच नव्हे, तर त्याअंतर्गत झालेल्या कायद्यांचे, कायदा करणार्यांचे आणि त्याचे पालन करावयास लावणार्या प्रशासकीय यंत्रणेचेही तेच अलिखित मत आहे. एवढेच कशाला, भारतीय शिक्षणव्यवस्थाही तेच मानते.
राज्यघटनेस केवळ सामाजिक सुधारणा अपेक्षित असती, तर कलम २५ (२ ब)मध्ये ‘हिंदु’ हा शब्दच आला नसता. ‘सामाजिक सुधारणा’ या गोंडस नावाखाली सरकारला हिंदु संस्थांमध्ये पालट करता आले नसते. कायद्याविषयी बोलायचे झाल्यास हिंदु वगळता अन्य एकाही ‘पर्सनल लॉ बोर्डा’चा एकही कायदा आजतागायत संपूर्णपणे ‘कोडिफाय’ (संहिताबद्ध) झालेला नाही. अगदी लग्नाचे वय ठरवणारा कायदाही ‘मुस्लीम पर्सनल लॉ’ रहित ठरवत नाही. असे असंख्य कायदे आहेत, जे लागू होतात, असेही ठामपणे म्हणता येत नाही आणि लागू होत नाहीत, असेही ठामपणे म्हणता येत नाही. यालाच ‘ग्रे एरिया’ म्हणतात. हा इतकी वर्षे मुद्दाम ‘ग्रे’ ठेवण्यात आला आहे. हिंदूंचे सरळ ‘ब्लॅक’ आणि ‘व्हाईट’ केले आहे.
शिक्षणात सामाजिक त्रुटी सांगतांना बालविवाह, केशवपन वगैरे सहस्रो गोष्टी केवळ हिंदु धर्माविषयी घृणा आणि नकारात्मक भाव निर्माण करणार्या शिकवल्या जातात. आजही मुसलमानांमध्ये बालविवाह आहे आणि तो कायदेशीर आहे, हे शिकवले जात नाही.
२. सनातन हिंदु धर्म संपवण्याचे काम लोकशाहीत पद्धतशीरपणे चालू !
अशा असंख्य गोष्टी आहेत, ज्या माध्यमातून सनातन हिंदु धर्म संपवण्याचे काम स्वतंत्र भारतातील लोकशाहीने पद्धतशीरपणे केले आहे आणि करत आहे. समता आणि समानता ही शस्त्रे त्यासाठी प्रभावीपणे वापरली जात आहेत. उदयनिधीने तेच थेट मांडले होते आणि १२ मे या दिवशी पुन्हा मांडले आहे. तो किमान थेट बोलण्याचे धाडस दाखवतो, भारतीय लोकशाही तीही दाखवत नाही. उदयनिधीसारख्या लोकांसाठी हिंदू हा कुत्र्याच्या पद्धतीने मरण्यायोग्य किंवा किड्या-मुंग्यांप्रमाणे संपवण्यायोग्य समाज आहे. प्रश्न त्याचा किंवा लोकशाहीचा नाहीच. प्रश्न आहे तो हिंदूंचा !
३. हिंदू स्वतःस काय समजतात, हा खरा प्रश्न आहे !
जगभरातील संस्कृतींना अवघ्या काही वर्षांत भुईसपाट करणार्या ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाम यांना सनातन वैदिक हिंदु धर्म संपवता आला नाही अन् इतकी वर्षे लोकशाहीसही ते जमले नाही. जगभरात केवळ एकच शक्ती हिंदु धर्माला संपवेल, ती म्हणजे स्वत: हिंदू. त्यामुळे हिंदू स्वतःस काय समजतात ? या प्रश्नाच्या उत्तरावरच हिंदूंचे अस्तित्व टिकणे किंवा संपणे अवलंबून आहे.
– श्री. प्रसन्न शिवराम बर्वे, पणजी, गोवा.
(साभार : ‘प्रसन्नवदने’ ब्लॉगवरून)

देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !