
मुंबई, १४ मे (वार्ता.) – मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणार्या लोकलमध्ये ७ मेपासून १९२ ‘एल्.ई.डी. स्क्रीन’द्वारे श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण आणि माहिती देण्यात येत आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मिळून ४ लोकलमध्ये ‘एल्.ई.डी. स्क्रीन’द्वारे यज्ञाचे विज्ञापन दाखवण्यात येत आहे. प्रत्येक रेल्वेगाडीच्या मार्गावरून एकूण २५ फेर्या होतात. त्यामुळे लोकलद्वारे नियमित प्रवास करणार्या लाखो नागरिकांपर्यंत महायज्ञाची माहिती पोचत आहे. या ‘स्क्रीन’वरून भगवान विष्णूच्या अवतारी कार्यातील श्री राजमातंगीदेवीचे योगदान, देवीचे कार्य, यज्ञाचे महत्त्व आणि यज्ञाला उपस्थित राहिल्यामुळे होणारा आध्यात्मिक लाभ यांविषयीची माहिती देण्यात येत आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !