‘२५.५.२०२५ या दिवशी पू. (कै.) भगवंतकुमार मेनराय यांचे पहिले वर्षश्राद्ध झाले. या श्राद्धात ठेवलेल्या पिंडांचे छायाचित्र पाहिल्यावर मला पू. (कै.) भगवंतकुमार मेनराय यांच्या संदर्भात सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

पू. (कै.) भगवंतकुमार मेनराय यांच्या दुसर्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. श्राद्धविधीचा आरंभ होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे

श्राद्धविधीच्या आधी सुश्री संगीता मेनराय (पू. (कै.) भगवंतकुमार मेनराय यांची मुलगी) यांच्या घरामध्ये काहीच जाणवत नव्हते. श्राद्धविधीस प्रारंभ झाला, तेव्हा तो करणारे पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी, सुश्री संगीताताई आणि श्री. प्रदीप मेनराय (पू. (कै.) भगवंतकुमार मेनराय यांचे पुतणे) यांच्यातील भावामुळे श्राद्धाच्या ठिकाणी ईश्वरी चैतन्य आकृष्ट होऊन ते कार्यरत झाले. त्यामुळे श्राद्धविधीच्या ठिकाणी प्रसन्नता आणि हलकेपणा जाणवू लागला. या श्राद्धविधीच्या वेळी ‘घरात श्राद्ध चालले नसून, श्री सत्यनारायणदेवाच्या पूजेचा विधी चालू असल्याप्रमाणे आनंद आणि शांती यांची स्पंदने जाणवत होती.
(हे बरोबर आहे. – सुश्री संगीता मेनराय)
२. वसुगणातील भाताच्या पिंडामध्ये सूक्ष्मातून पू. (कै.) भगवंतकुमार मेनराय यांचा लिंगदेह आल्यामुळे त्या पिंडामध्ये पिवळसर रंगाचे चैतन्य कार्यरत होऊन तो पिंड तेजस्वी दिसणे
श्राद्धविधीमध्ये मांडलेल्या भाताच्या ३ पिंडांमध्ये सुश्री संगीता मेनराय यांचे वसुगणातील वडील, रुद्र गणातील आजोबा आणि आदित्य गणातील पणजोबा यांचे आवाहन केल्यावर रुद्र अन् आदित्य गणातील पिंडांमध्ये रजप्रधान लालसर रंगाच्या शक्तीची स्पंदने कार्यरत झाल्याचे जाणवले, तसेच वसुगणातील भाताच्या पिंडामध्ये सूक्ष्मातून पू. (कै.) भगवंतकुमार मेनराय यांचा लिंगदेह आल्यामुळे त्या पिंडामध्ये पिवळसर रंगाचे चैतन्य कार्यरत होऊन तो पिंड तेजस्वी दिसत होता आणि तो सूक्ष्मातून भूमीपासून ५ – ६ इंच वरती तरंगत असल्याचे जाणवले.
३. पू. (कै.) भगवंतकुमार मेनराय यांच्यासाठीच्या पिंडाकडे पाहिल्यावर आलेल्या अनुभूती
वसुगणातील भाताच्या पिंडाकडे पाहिल्यावर मला आध्यात्मिक लाभ होऊन हलके वाटले, तसेच मला त्या पिंडातून प्रक्षेपित होणार्या चैतन्यामुळे सुश्री संगीता मेनराय यांची पूर्ण वास्तू आणि संपूर्ण वसाहत यांची अन् तेथील वातावरणाची शुद्धी झाल्याचे जाणवले. त्यामुळे केवळ श्राद्धस्थळच नव्हे, तर सभोवतालचे संपूर्ण वातावरणच चैतन्यदायी झाल्याचे मला जाणवले.
४. पू. (कै.) भगवंतकुमार मेनराय यांच्या लिंगदेहाने पितृलोकात अडकलेल्या व्यष्टी आणि समष्टी प्रकृतीच्या पितरांना त्यांच्या प्रकृतीनुसार साधना सांगणे

वर्षश्राद्धाच्या विधीमुळे मेनराय कुळातील वसुगणातील पितरांमध्ये पू. (कै.) भगवंतकुमार मेनराय यांना वडिलांशी संबंधित असलेल्या वसुगणात स्थान मिळाले, तसेच सुश्री संगीता मेनराय हिच्या आजोबांना रुद्रगणातील आणि पणजोबांना आदित्य गणातील पितरांचे स्थान मिळाले. त्यामुळे सुश्री संगीता मेनराय यांच्या खापर पणजोबांच्या लिंगदेहाला सद्गती मिळाली. अशा प्रकारे या वर्षश्राद्धाच्या विधीमुळे पू. (कै.) मेनराय यांच्या लिंगदेहाचे पुसटसे स्थान भुवलोकातील पितृलोकात निर्माण झाले. त्यामुळे श्राद्धविधी चालू असतांना पू. (कै.) मेनराय यांचा लिंगदेह काही क्षणांसाठी पितृलोकात जाऊन आला. त्याने तेथे अडकलेल्या पितरांना सद्गती मिळण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप भावपूर्णरित्या अधिकाधिक प्रमाणात करण्यास सांगितले. त्याचप्रमाणे काही पितर समष्टी प्रकृतीचे होते. त्यांना पू. (कै.) मेनराय यांच्या लिंगदेहाने पृथ्वीवर स्थापन होणार्या हिंदु राष्ट्रासाठी भगवान श्रीकृष्णाला भावपूर्ण प्रार्थना करून ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप अधिकाधिक प्रमाणात करण्यास सांगितले. यावरून ‘संतांमध्ये किती समष्टीभाव आणि समष्टीच्या कल्याणाची तळमळ असते’, ते अनुभवण्यास मिळाले.
५. श्राद्धातील भोजनाच्या पानातील पदार्थ कावळ्याच्या रूपातील पितरांनी येऊन ग्रहण केल्याचे जाणवणे
‘श्राद्धविधीनंतर श्राद्धासाठी केलेल्या भोजनाचे पान घराच्या बाहेर नेल्यावर, ते अन्न ग्रहण करण्यासाठी एक सुदृढ गाय आणि कावळा आले होते’, असे मला संगीताताईने श्राद्धविधीनंतर सांगितले. तेव्हा मला असे जाणवले, ‘सद्गती मिळालेले खापर पणजोबा यांचा लिंगदेह कावळ्याच्या रूपात येऊन त्याने श्राद्धातील अन्न ग्रहण करून ते तृप्त झाले.’
६. पू. (कै.) भगवंतकुमार मेनराय यांच्या लिंगदेहाने श्राद्धविधीला उपस्थित असणार्या सर्वांना आशीर्वाद देऊन जनलोकाकडे प्रयाण करणे
संपूर्ण श्राद्धविधी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने आणि भावपूर्णरित्या झाल्यामुळे पू. (कै.) भगवंतकुमार मेनराय यांच्या लिंगदेहाने सुश्री संगीता, वझेगुरुजी आणि श्राद्धविधीला उपस्थित असणारे नातेवाईक यांना साधना चांगली होण्यासाठी आशीर्वाद दिले. पू. (कै.) भगवंतकुमार मेनराय हे संत असल्यामुळे त्यांचे मूळ स्थान जनलोकात आहे. त्यामुळे श्राद्धविधी संपल्यावर त्यांचा लिंगदेह पृथ्वीतील भाताच्या पिंडातून मुक्त होऊन शिवलोकाकडे जाऊन तेथे शिवाच्या सूक्ष्म देहात आत्मज्योतीच्या स्वरूपात विलीन झाला.
कृतज्ञता
‘अशा प्रकारे श्रीदत्तगुरूंच्या कृपेने मला वरील अनुभूती अनुभवण्यास मिळाल्या आणि देहत्याग केलेल्या संतांचे सूक्ष्मातील कार्य अनुभवता आले’, यासाठी मी देवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. १.६.२०२५)
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !