
मुंबई – नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे वर्ष २०२७ मध्ये होणार्या सिंहस्थ कुंभपर्वाच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कुंभपर्वाच्या बोधचिन्हासाठी ‘कुंभमेळा प्राधिकरणा’च्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत अनुमाने ३ सहस्रांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून ३ उत्कृष्ट स्पर्धकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या पुणे येथील सुमित काटे यांना ३ लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या नोएडा येथील मयांक नायक यांना २ लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांक पटकावलेल्या पंढरपूर येथील पियुष पिंपळनेरकर यांना १ लाख रुपयांचा धनादेश अन् सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी प्रास्ताविकाद्वारे कुंभपर्वाच्या आयोजनाविषयी माहिती दिली.
या वेळी विविध आखाड्यांचे साधू-संत उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी उपस्थित साधू-संतांचे स्वागत केले.

स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक