BJP Offices Attacked : पंजाबमध्ये भाजपच्या २ कार्यालयांवर आक्रमण करून तोडफोड

मोहाली (पंजाब) – पंजाबमध्ये ११ मे या दिवशी भाजपच्या २ कार्यालयांवर आक्रमण करून तोडफोड करण्यात आली. मोहालीतील झिरकपूरमध्ये ५ मुखवटाधारी तरुण भाजपच्या कार्यालयात घुसले आणि भिंती अन् भित्तीपत्रके यांवर शाई फेकली. यानंतर ते पळून गेले.

तरनतारण येथील घटनेत १५ ते २० लोक अचानक भाजपच्या कार्यालयात काठ्या घेऊन घुसले आणि तोडफोड केली, तसेच खुर्च्या आणि इतर सामान यांची हानी केली. या वेळी काही जण दगडफेक करतांना दिसले. त्यांनी ‘पंजाब एकता जिंदाबाद’ आणि ‘भाजप मुर्दाबाद’ अशी पत्रकेही हवेत भिरकवली. या वेळी भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांनी एका आक्रमणकर्त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

संपादकीय भूमिका

आम आदमी पक्षाच्या सरकारच्या काळात पंजाबमध्ये राजकीय पक्षाच्या कार्यालयावर दिवसाढवळ्या आक्रमण होणे, हे लज्जास्पद !