हिंदु तरुणीच्या धर्मपरिवर्तनासाठी निदा खानने तिला इस्लामी संकेतस्थळांच्या १७१ लिंक्स पाठवल्या !

  • नाशिक येथील टी.सी.एस्.मधील कॉर्पाेरेट जिहाद

  • पोलिसांच्या चौकशीतून माहिती उघड

  • निदाच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी चालू !

टी.सी.एस्. प्रकरणातील आरोपी निदा खान

नाशिक – येथील टी.सी.एस्. प्रकरणातील आरोपी निदा खान हिने पीडित तरुणीचे धर्मपरिवर्तन करण्यासाठी इस्लामची माहिती देणार्‍या १७१ संगणकीय लिंक्स पाठवल्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलीस कोठडीत असतांना अन्वेषण पथकाने निदा खानला तिच्या घरी आणि आस्थापनातही नेले. तेथे पुरावे गोळा करण्यासाठी पंचनामा करण्यात आला.

. निदाने पीडितेला इस्लाम धर्माकडे आकर्षित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते. निदा पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी आणि अनुष्ठान करायची. निदाने पीडितेला बुरखा परिधान करण्यास भाग पाडल्याचाही आरोप करण्यात आला.

. सातत्याने दिली जाणारी धार्मिक शिकवण आणि व्हिडिओ यांच्या माध्यमातून पीडितेची विचारसरणी पालटण्याचा प्रयत्न करण्यात आला. निदा खानचा भ्रमणभाष न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. निदाने पुसून टाकलेले संदेश, व्हिडिओ आणि क्रमांक पुन्हा प्राप्त झाल्यानंतर काही गोष्टींचा उलगडा होईल.

. आर्थिक व्यवहारांच्या अन्वेषणासाठी निदाचे अधिकोषाचे पासबूकही जप्त करण्यात आले आहे. तिला विशिष्ट गटाकडून निधी मिळत असल्याचा संशय अन्वेषण अधिकार्‍यांनी यापूर्वीच न्यायालयात व्यक्त केला होता.