
‘भगवान श्रीकृष्णाचे साक्षात् वाङ्मय-मूर्ती, महानतम महाकाव्य ‘महाभारत’ हे हृदय आहे. मानवजातीच्या कल्याणाचे चिरंतन प्रेरक अमोघ शास्त्र असलेल्या गीतेचे अध्ययन आज शिक्षणतज्ञ, प्रशासक आणि राजकीय नेते यांच्या समवेत मोठ्या आस्थापनाचे मुख्य हुकूम देणारे अधिकारी अन् वरिष्ठ व्यवस्थापकसुद्धा करत आहेत. गीतेमुळे ते आपल्या संस्थांमध्ये योग्य आणि संतुलित निर्णय घेऊ शकतील. जगातील श्रेष्ठतम व्यवस्थापकीय संस्था, उदा. ‘हार्वर्ड बिजनेस स्कूल, कॅलॉग स्कूल ऑफ बिझनेस, रॉस स्कूल ऑफ बिजनेस’ इत्यादींमध्ये भगवद्गीतेचा अभ्यासक्रम शिकवला जात आहे. आज ‘युनेस्को’ने वैदिक मंत्रोच्चारणाच्या पद्धतीला ‘आंतरराष्ट्रीय वारसा’ घोषित केले आहे. अनेकानेक भारतीय आणि जगातील विद्वानांनी गीतेची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे अन् तिचा महिमा स्वीकारला आहे.’
(साभार : मासिक ‘कल्याण’, डिसेंबर २०२२)
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !
काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?