पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेले आवाहन आणि त्यावर होणारा परकीय चलनाचा खर्च !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतियांना केलेले आवाहन !

इराण युद्धामुळे इंधनाचा तुटवडा होत असल्याने देशाच्या आर्थिक स्थितीवर येणारा ताण अल्प करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतियांना आवाहन केले आहे. त्यादृष्टीने त्यांनी ज्या संदर्भात आवाहन केले, त्यावर प्रतिवर्षी किती रुपये भारताला खर्च करावे लागतात ?, याची माहिती खाली दिली आहे. जर जनतेने पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाचे पालन केले, तर भारताच्या परकीय चलनाची बचत होईल; कारण या सर्व वस्तू परदेशातून आयात कराव्या लागतात.

(चित्रावर क्लिक करा)

वाचा संपादकीय → आर्थिक शिस्त

पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाची सर्व देशवासियांनी कार्यवाही करावी ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अद्यापही घरगुती गॅससाठी सर्वसामान्यांना रांगेत उभे राहावे लागत आहे. भविष्यातील परिस्थितीमुळे देशवासियांना स्वतःवर काही बंधने घालावी लागतील. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काही महत्त्वाची आवाहने केली आहेत. त्यांची आवाहने योग्य आहेत. पंतप्रधानांनी केलेल्या या आवाहनांवर सर्व देशवासियांनी कार्यवाही करावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की,

पाकिस्तानमध्ये ४५० रुपये प्रतिलिटर तेलाचे भाव झाले आहेत; मात्र आपल्या पंतप्रधानांनी कुठल्याही पद्धतीने पुरवठ्यावर परिणाम होऊ दिला नाही; पण मूळ अडचण जर आपण जाणून घेतली नाही आणि याचा वापर योग्य प्रमाणात केला नाही, तर आपल्यालाही अडचणीचा सामना करावा लागेल.

हे ही वाचा → पुढील १ वर्ष देशहितासाठी सोने खरेदी करू नका ! – PM Modi Appeals