‘मनुष्याच्या विविध कृती या प्राधान्याने सत्त्वगुणी, रजोगुणी किंवा तमोगुणी असतात. त्या गुणांनुसार त्या त्या कृतीतून स्पंदने प्रक्षेपित होत असतात. ‘उच्च आध्यात्मिक स्तराच्या, म्हणजे ‘परात्पर गुरु’ पातळीच्या संतांच्या संदर्भात हे कसे असते ?’, याचा अभ्यास करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या (गुरुदेवांच्या) पुढील ४ कृतींचा अभ्यास करण्यात आला. १. ते झोपलेले असणे, २. ते मार्गदर्शन करत असणे, ३. त्यांनी स्वतःचे औक्षण करून घेणे आणि ४. ते काहीही कृती करत नसणे.

१. सामान्य व्यक्तीच्या वरील ४ कृतींचे सत्त्व, रज आणि तम गुणांनुसार वर्गीकरण
१ अ. व्यक्ती झोपणे : ही कृती सामान्यतः तमोगुणप्रधान असते; कारण सामान्य व्यक्तीच्या मनात मायेतील विचार असतात. तसेच तिच्यामध्ये स्वभावदोष आणि अहं असतो. त्यामुळे ती झोपल्यावरही तिला तिच्या मनातील विचार आणि तिच्यातील स्वभावदोष अन् अहं यांनुसार स्वप्ने पडतात.

१ आ. व्यक्तीने दुसर्याला काही सांगणे : सामान्य व्यक्तीची ही कृती सामान्यतः रजोगुणप्रधान असते.
१ इ. व्यक्तीचे औक्षण करून घेणे : ही कृती तिच्यातील उद्देशानुसार सत्त्वगुण प्रक्षेपित करणारी आहे.
१ ई. व्यक्तीने काहीही न करणे (सहजस्थिती) : सामान्य व्यक्ती स्वस्थ बसलेली असतांनाही तिच्या मनात मायेतील विचार चालू असतात. त्यामुळे तेव्हा त्या व्यक्तीकडून रजोगुण प्रक्षेपित होत असतो.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेल्या वरील ४ कृतींतून प्रक्षेपित होणारी स्पंदने
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेल्या वरील ४ कृतींतून प्रक्षेपित होणारी स्पंदने दर्शवणारी बाजूला दिलेली सारणी पहा आणि नंतर पुढील भाग वाचा.


२ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले झोपलेले असणे : सच्चिदानंद परब्रह्मडॉ. आठवले यांची ही कृती सामान्य व्यक्तीप्रमाणे तमोगुणप्रधान नसून सत्त्वगुणप्रधान आहे, हे बाजूच्या सारणीतून लक्षात येते. त्यांच्या आध्यात्मिक पातळीमुळे ते झोपलेले असतांनाही त्यांच्याकडून सूक्ष्मातील सत्त्वगुणी कार्य चाललेले असते. ‘समष्टी साधना म्हणून या पृथ्वीतलावर रामराज्य स्थापन करणे’, हे त्यांचे ध्येय आहे. ते झोपलेले असतांना हे कार्य निर्गुणात राहून करतात. तेव्हा त्यांच्याकडून तारक-मारक कार्य चाललेले असते. तेव्हा त्यांची शक्ती कार्यरत असते.

२ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मार्गदर्शन करणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची ही कृती थोडी अधिक सत्त्वगुणी असून तिच्यात तमोगुण काहीच नाही; कारण त्यांचे मार्गदर्शन मायेतील विषयासंदर्भात नसून व्यष्टी साधना, राष्ट्र-धर्म यांविषयी करायची समष्टी साधना आणि ईश्वरप्राप्ती यांविषयीच असते. हे विषय शाश्वत सत्य आहेत. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनात सत्त्वगुण आहे. तसेच हे मार्गदर्शन अधिक तारक तत्त्वाचे आहे. हे मार्गदर्शन करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते.


२ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे औक्षण करणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची ही कृती सर्वांत सत्त्वगुणी होती. ज्या व्यक्तीचे औक्षण करतो, तिच्याकडे ईश्वरी तत्त्व येते, हे यातून लक्षात येते. तसेच औक्षण केल्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील सगुण तत्त्व आणि तारक तत्त्व सर्वाधिक झाले. त्यांच्यातील अनुभूतीजन्य स्पंदनांपैकी आनंद आणि शांती या घटकांचे प्रमाण औक्षण केल्यामुळे वाढले.
२ ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काहीही न करणे (सहजस्थिती) : या स्थितीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील सत्त्व-रज-तम स्पंदने आणि ते झोपलेले असतांना त्यांच्यातील सत्त्व-रज-तम स्पंदने एकसारखीच आहेत. यावरून लक्षात येते की, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले झोपले, तरी त्यांच्यातील सत्त्वगुण अल्प होत नाही. आणखी एक लक्षात आले, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले कोणतीही कृती करत नसले, तरी त्यांच्यातील आनंदाची स्पंदने अधिक असतात. ते सहजस्थितीतही आनंदावस्थेत असतात.’
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या (गुरुदेवांच्या) विविध कृतींच्या छायाचित्रांच्या लोलकाने परीक्षण करून केलेल्या नोंदी आणि त्यांचे विवेचन
‘गुरुदेवांच्या छायाचित्रांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. या छायाचित्रांतील सकारात्मक ऊर्जेच्या नोंदी पुढे दिल्या आहेत.

वरील नोंदींवरून लक्षात येते की, गुरुदेवांमध्ये मुळातच पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी विविध कृती करतांना त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण निरनिराळे आहे.
३ अ. विश्लेषण : सर्वसाधारण व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच असे नाही. सकारात्मक ऊर्जेला चैतन्य असेही समजता येते. सध्याच्या कलियुगात बर्याच जणांमध्ये नकारात्मक ऊर्जाही असते. साधना करणार्या व्यक्तीच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ साधारणपणे १ ते २ मीटर किंवा त्याहीपेक्षा अधिक असू शकते. याचे प्रमाण तिच्या साधनेवर अवलंबून असते. गुरुदेव अध्यात्मातील अत्युच्च स्थितीला आहेत. त्यामुळे त्यांच्यात मुळातच पुष्कळ प्रमाणात चैतन्य आहे. त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ सहस्रो किलोमीटर आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी विविध कृती करतांना त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण निरनिराळे आहे. याचे कारण हे की, त्यांच्याकडून समष्टीच्या कल्याणासाठी सतत चैतन्य प्रक्षेपित होत असते. कार्यानुसार त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचा स्तर पालटत असतो. त्यामुळे त्यांच्यातील सगुण तत्त्व अन् निर्गुण तत्त्व यांचे प्रमाण, तसेच शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती या स्पंदनांचे प्रमाणही पालटत असते, उदा. ते झोपलेले असतांना अन्य स्पंदनांच्या तुलनेत त्यांच्याकडून निर्गुण स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित झाली आहेत. यामुळे निर्गुण तत्त्वाचे प्रमाण अधिक आहे. याउलट औक्षणाच्या वेळी त्यांच्याकडून भाव, चैतन्य आणि आनंद यांची स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित झाली आहेत. यामुळे सगुण तत्त्वाचे प्रमाण वाढले आहे. गुरुदेवांच्या ४ छायाचित्रांपैकी त्यांच्या औक्षणाच्या वेळच्या छायाचित्राची सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक आली आहे. याचे कारण गुरुदेवांच्या स्पंदनांवरून लक्षात येते. त्या वेळी गुरुदेवांचा सत्त्वगुण सर्वाधिक आहे !’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रातील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ) आणि सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
(२०.१२.२०२५)
देश दुर्दशेला पोचण्यामागे हे आहे कारण !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘सत्संग’ आणि कला !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
साधकांनो, देवाने दिलेल्या देहरूपी देणगीचा साधनेसाठी उपयोग करून नरदेहाचे सार्थक करा !