अकोला येथे पहिल्या भव्य हिंदु राष्ट्र-जागृती सभेत १६ सहस्रांहून अधिक हिंदूंची एकजूट !
|

अकोला, ८ मे (वार्ता.) – ज्या क्रूरकर्म्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना थोडेथोडके नव्हे, तर ४९ दिवस अतोनात छळ करून ठार मारले, काशी विश्वनाथ मंदिर तोडले, त्या औरंगजेबाच्या कबरीसाठी महाराष्ट्र सरकार प्रतिवर्षी साडे ६ लाख रुपये देत आहे, हे अयोग्य आहे. महाराष्ट्रातील हिंदू जागृत झाला आहे. त्यामुळे काहीही झाले, तरी औरंगजेबाची कबर आणि त्याचे नाव यांना महाराष्ट्रातील हिंदूंचा वैध मार्गाने विरोध असणारच आहे. हिंदू जर त्याच्या विरोधात आहेत, तर अशा आक्रमणकर्त्याचे महाराष्ट्र सरकार लाखो रुपये देऊन उदात्तीकरण का करत आहे ? असा रोखठोक प्रश्न तेलंगाणाचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी ३ मे या दिवशी अकोला येथे झालेल्या भव्य ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त उपस्थित केला. सभेला १६ सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती लाभली.

हिंदुत्वाच्या बळावर केला हिंदूंनी निर्धार । हिंदु राष्ट्र नसे केवळ स्वप्न, तोच हिंदूंचा आधार ।।
हिंदुत्वाच्या घोषणा देत हिंदूंनी एकवीरा मैदान दणाणून सोडले होते. कपाळावर टिळा लावूनच सर्वांना सभास्थळी प्रवेश देण्यात आला. या सभेच्या माध्यमातून अकोलावासियांमध्ये हिंदुत्वाचा अंगार प्रज्वलित झाला.
🔥 “Declare Bharat a Hindu Rashtra!” – Fiery call by @TigerRajaSingh
Akola, Maharashtra: At the Hindu Rashtra-Jagruti Sabha organised by the Hindu Rashtra Samanvay Samiti, attended by over 16,000 Hindus, Raja Singh strongly opposed government funds being used for Aurangzeb’s… pic.twitter.com/bnTx36V299
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 7, 2026
सभेतील मान्यवरांचे उद्बोधक विचार आणि वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी !
हिंदूंनो, दमन न होण्यासाठी ‘हिंदु’ म्हणून संघटित व्हा ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

१. साधारण २ दशकांपूर्वी जिहादी आतंकवादाला झाकण्यासाठी ‘हिंदु आतंकवाद’ किंवा ‘भगवा आतंकवाद’ असा शब्दप्रयोग पद्धतशीरपणे करण्यात आला. हे हिंदुत्वनिष्ठ संघटनांना दडपण्याचे ‘टूलकीट’ (विरोधी यंत्रणा) होते. त्यामुळे मालेगाव बाँबस्फोट प्रकरण, तसेच दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी-गौरी लंकेश या हत्या प्रकरणांतही हिंदुत्वनिष्ठांना नाहक गोवण्यात आले. त्यांचा अतोनात छळ करण्यात आला; पण हे हिंदु वीर बधले नाहीत. शेवटी सत्याचा विजय झाला. न्यायालयाने मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील सर्व हिंदुत्वनिष्ठांची निर्दोष मुक्तता केली. सत्य कितीही दडपले, तरी ते कायमस्वरूपी दडपले जाऊ शकत नाही. आज हिंदूंना दडपण्याचे प्रयत्न सर्वत्र चालूच आहेत. त्यामुळे ‘धटासी आणावा धट । उद्धटासी पाहिजे उद्धट ।।’ या समर्थांच्या वचनानुसार वागावे लागेल. भगवा हा आतंकवादाचे नाही, तर शौर्याचे प्रतीक आहे. भविष्यात हिंदुत्वनिष्ठांचे दमन होऊ नये; म्हणून हिंदूंना जात, पात, पक्ष आणि संप्रदाय विसरून ‘हिंदु’ म्हणून संघटित व्हावे लागेल.
२. आज हिंदुत्वनिष्ठ संघटना अनेक आहेत; पण त्यांचे संघटन नाही; म्हणून पुरो(अधो)गाम्यांच्या दबावाला हिंदू भुलतात.
३. आतंकवादी कसाबला सरकारी पैशांतून अधिवक्ता दिला जातो. आतंकवादी याकूब मेमन याला न्याय देण्यासाठी रात्री १ वाजता न्यायालयाचे दारही उघडले जाते; पण निष्पाप हिंदुत्वनिष्ठांना न्याय मिळत नाही. त्यांचा छळ होतो, हे दुर्दैवी आहे.
छत्रपती शिवरायांचा अपमान करणार्यांना हिंदु समाज चोख प्रत्युत्तर देईल ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

१. मौलाना साजिद यांच्यासारखी मंडळी भारत-इराण युद्धात इराणची बाजू घेण्याची भाषा करतात आणि छत्रपतींच्या साम्राज्याला नाकारतात, हे अत्यंत गंभीर आहे. अफझलखान आणि शाहिस्तेखान यांना छत्रपतींचे सामर्थ्य ठाऊक होते, अशा आक्रमकांचे उदात्तीकरण करून छत्रपतींचा अपमान करणार्यांना आता हिंदु समाज चोख प्रत्युत्तर देईल.
२. सध्या राज्यात ‘लव्ह जिहाद’सह ‘कॉर्पोरेट जिहाद’चेही संकट उभे राहिले आहे. परतवाड्यातील १८० मुलींचे उदाहरण असो वा नागपूर-कोल्हापूरमधील प्रकरणे असोत, आता व्यावसायिक क्षेत्रात हिंदूंच्या मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत. अकोल्याच्या ‘बिंदी’ घर प्रकरणातून हिंदूंनी बोध घेतला पाहिजे. (‘बिंदी घर’ प्रकरण म्हणजे अकोला येथील सौंदर्यप्रसाधनांशी संबंधित दुकानांमध्ये काही महिलांना बोलावून त्यांचे लैंगिक शोषण करणे, धमकी देणे, मानसिक त्रास देणे असे प्रकार करण्यात आले. याविरोधात पोलीस अन्वेषण करत असून काही जणांना यात अटकही केलेली आहे.) अशा प्रवृत्तींना पाठबळ देणार्यांना भविष्यात साहाय्य करणे थांबवले पाहिजे.
३. अकोल्यातील ‘शिवाजी पेठ’ हे नाव ‘छत्रपती शिवाजी पेठ’ झालेच पाहिजे, वाशिमचे ‘वत्सगुल्म’ आणि मंगळूर पीरचे ‘मंगळूर नाथ’ असे नामकरण करून स्वाभिमान जागृत ठेवला पाहिजे.
४. देवतांचे विडंबन, मूर्तीभंजन, धर्मांतर किंवा मंदिरावरील आघात यांविरोधात गावागावांत आता ‘ग्राम सुरक्षा दला’ची स्थापना होणे आवश्यक आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी कॉ. गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकावर बंदी घाला’, अशी मागणीही या वेळी श्री. सुनील घनवट यांनी केली.
हिंदूंच्या भूमीत हिंदूंच्याच सभेला विरोध होणे दुर्दैवी ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयकहिंदु राष्ट्र-जागृती सभेला अकोल्यात तीव्र विरोध झाला. या पार्श्वभूमीवर सभेत बोलतांना श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘हिंदूंच्या भूमीत हिंदूंच्याच सभेला अकोला येथे विरोध होणे दुर्दैवी आहे. हा देश हिंदूंचा ! ही भूमी हिंदूंची ! हा महाराष्ट्र छत्रपतींचा ! त्यामुळे येथे सभा होणारच. जर हिंदूंच्या भूमीत सभा घ्यायची नाही, तर काय पाकिस्तानात जाऊन घ्यायची का ?’’ |
आजचा हिंदु घाबरणारा नाही, तर घाबरवणारा हवा ! – टी. राजासिंह, आमदार

१. विदर्भातील नरनाळा आणि नरसिंहगड या गडांवरील बेकायदेशीर बांधकाम अन् ‘लँड जिहाद’ थांबवायला हवा. एखादा मावळा तिथे भगवा लावायला जातो, तेव्हा त्याच्यावर गुन्हा नोंदवला जातो. पुरातत्व विभागाने कारवाई न केल्यास मावळ्यांना कृतीशील व्हावे लागेल.
२. आम्ही भारतात संकल्प घेऊन पुढे जात आहोत, तो म्हणजे निद्रिस्त हिंदूंना जागे करणे, जाती-पातींत विभागलेल्या हिंदूंना संघटित करणे. हिंदू विभागला जाऊ नये, यासाठी भारताला हिंदु राष्ट्र बनवणे हा संकल्प आहे. भारताला अधिकृतपणे ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची वेळ आली आहे.
३. आपण महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत जन्मलो, याचा अभिमान वाटायला हवा; पण आपले दुर्दैव हे आहे की, आपण एका निधर्मी राज्यात आहोत. श्रीरामाच्या शोभायात्रेच्या वेळी हिंदूंना घाबरवले जाते. खोट्या तक्रारी प्रविष्ट केल्या जातात. तेलंगाणा पोलिसांनी माझ्यावर १८० खटले प्रविष्ट केले आहेत; पण मी घाबरलो नाही; कारण आपण छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे मावळे आहोत.
४. ‘लव्ह जिहाद’ आणि गोहत्येच्या वाढत्या घटना खेदजनक आहेत. गोमातेला ‘राज्यमाता’ दर्जा मिळूनही तस्करी होणे, हे प्रशासनाचे अपयश आहे.
५. धर्मांतराच्या पार्श्वभूमीवर हिंदूंनी संकल्प करावा की, मी महाराष्ट्रातील शेवटच्या हिंदूलाही जागृत करीन.
६. काही जणांकडून सभेला सहकार्य करणार्या व्यापार्यांना धमकावले गेले. मी व्यापार्यांना सांगतो, ‘घाबरू नका, तक्रार द्या.’ आजचा हिंदु घाबरणारा नाही, तर घाबरवणारा हवा.
हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी गौरवोद्गार !हिंदु जनजागृती समिती अनेक अडचणींचा सामना करत देश वाचवण्यासाठी अहोरात्र कार्य करत आहे. – आमदार टी. राजासिंह |
‘टिपू सुलतान’ऐवजी महानगरपालिकेच्या सभागृहाचे ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ असे नामकरण करण्याची मागणी !

अकोला महानगरपालिकेच्या ज्या सभागृहाला ‘टिपू सुलतान’चे नाव देण्यात आले आहे, ते तातडीने पालटून ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ असे करण्यात यावे, अशी आग्रही मागणी टी. राजासिंह यांनी केली.
जिवंत असेपर्यंत भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी आवाज उठवणार !
भ्रमणभाषची विजेरी लावून उपस्थितांकडून करून घेतलेला संकल्प !

टी. राजासिंह यांनी हिंदूंना भ्रमणभाषची विजेरी लावण्यास सांगून संकल्प करून घेतला, ‘‘मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी आवाज उठवत राहीन. गोमातेच्या रक्षणासाठी कार्य करीन. लव्ह जिहादी आणि धर्मांतर करणार्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देईन. मी हिंदु धर्माच्या रक्षणासाठी कार्य करीन.’’
‘मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळा असून शेवटच्या हिंदूच्या रक्षणासाठी मी कटीबद्ध आहे’, असा संकल्पही त्यांनी उपस्थितांकडून करून घेतला.
अशी झाली सभा !
प्रारंभी शंखनादानंतर आमदार टी. राजासिंह, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी दीपप्रज्वलन केले. टी. राजासिंह यांनी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. पुरोहितांच्या वेदमंत्रपठणामुळे वातावरण चैतन्यमय झाले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. चैतन्य तागडे यांनी सूत्रसंचालन केले. ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चा परिचय संयोजक श्री. उदय महा यांनी करून दिला.
| राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याविषयी संघाचा कृतज्ञतापूर्वक गौरव आणि अभिनंदन करण्यात आले. |
संतांची वंदनीय उपस्थिती !
श्री ईश्वरदास महाराज, पू. बालकदास महाराज आणि सनातन संस्थेचे पू. अशोक पात्रीकर

उपस्थित मान्यवर
भाजपचे खासदार अनुप धोत्रे, भाजपचे आमदार रणधीर सावरकर, महापौर शारदा खेडकर, उपमहापौर अमोल गोगे, माजी महापौर सुमन गावंडे, महापालिका सभागृह नेते पवन महल्ले, शिवसेना शहरप्रमुख राजेश मिश्रा आणि उपजिल्हाप्रमुख योगेश अग्रवाल, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. राजू मंजुळकर, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. धनंजय मेहसरे, तसेच श्री. विजय इंगळे
क्षणचित्रे
१. बालसंस्कार कक्षाद्वारे बालसाधक घोषणा देत होते. उपस्थितांनी त्यांचे चित्रीकरण करत त्यांना प्रतिसाद दिला.
२. छत्तीसगड येथून २५ हिंदु तरुण आले.
३. ‘मंडपव्यवस्था चांगली केल्याने आमच्यावर ताण आला नाही’, असे पोलिसांनी सांगितले. सभेला अनुमती मिळण्यापासून पोलिसांचे सहकार्य लाभले.
थेट प्रक्षेपणाद्वारे सभेचा लाभ !‘टीव्ही ९’ या इलेक्ट्रॉनिक मीडियावरून (वृत्तवाहिनीवरून) सभेचे सर्वाधिक वेळ म्हणजे ४५ मिनिटे थेट प्रक्षेपण करण्यात आले. याचा सर्वत्रच्या हिंदूंना लाभ घेता आला. |
अकोला येथील सभा ‘न भूतो न भविष्यति’ झाली ! – उदय महा, संयोजक, हिंदु राष्ट्र समन्वय समिती, अकोला
‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या अंतर्गत आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी धर्मप्रेमींनी प्रसार केला. त्यामुळे मोठ्या संख्येने धर्मप्रेमी आले. सभेला काहींनी विरोध करत ‘शहरातील वातावरण बिघडेल’, असा आरोप केला. प्रशासनावर दबाव आणला; पण सर्वांनी मिळून पोलिसांना सभेचा उद्देश सांगून सभेची अनुमती मिळवली. सभेच्या दिवशी सकाळपासून सोसाट्याचा वारा वहात असल्याने व्यासपिठावर फ्लेक्स लावणे शक्य होत नव्हते. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांनी सांगितल्याप्रमाणे नामजपादी उपाय केल्यावर वारा थांबला. सभा संपेपर्यंत वार्याचा अडथळा आला नाही. सभेला ‘न भूतो न भविष्यति’ अशी धर्मप्रेमींची उपस्थिती लाभली. सभेचे संयोजक होण्याचे भाग्य लाभले, यासाठी मी कृतज्ञ आहे.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीने घेतलेली ही पहिलीच सभा होती. यांतील सर्वांचीच मने जुळल्याने समन्वय चांगला होऊन ती निर्विघ्नपणे पार पडली.
ईश्वरी कार्य कसे पूर्णत्वास जाते, याची प्रचीती आली ! – योगेश अग्रवाल, सहसंयोजक, हिंदु राष्ट्र समन्वय समितीसभेच्या नियोजनात अडथळे आले; पण ते दूरही झाले. ‘सहस्रोंच्या संख्येने लोक येतील का ?’, असे वाटले; पण श्रद्धा ठेवल्याने ईश्वरी कार्य पूर्णत्वास जाते, ते अनुभवता आले. पुष्कळ गर्दी होऊनही सभा शांततेत पार पडली. व्यावसायिकांनी विनामूल्य सहभाग घेऊन सभेला प्रसिद्धी दिली. – श्री. योगेश अग्रवाल, सहसंयोजक, हिंदु राष्ट्र समन्वय समिती |
सभेच्या आदल्या आणि दुसर्या दिवशी अनुक्रमे ४६ अन् ४५ ‘डिग्री’ तापमान होते; पण सभेच्या दिवशी तापमान ४२ ‘डिग्री’ असल्याने उन्हाचा त्रास अल्प झाला. प्रसाराच्या कालावधीत तीव्र ऊन असूनही साधकांना त्रास झाला नाही.
अनुभूतीप्रार्थना केल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून सभास्थळी नेणे, त्यांच्या अस्तित्वामुळे वाईट शक्ती पळून जाणे आणि सभास्थळी चैतन्यमय वातावरण निर्माण झाल्याचे दिसणे![]() हिंदु राष्ट्र-जागृती सभेला मी काही कारणास्तव जाऊ शकले नाही. मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केली, ‘मला सभा सूक्ष्मातून अनुभवता येऊ दे.’ तेव्हा त्यांनी माझा हात धरून मला सूक्ष्मातून व्यासपिठाच्या ठिकाणी नेले. वेदमंत्रपठणाच्या वेळी आकाशातून देवता तिन्ही वक्त्यांवर पुष्पवृष्टी करतांना दिसल्या. गुरुदेवांच्या अस्तित्वामुळे वाईट शक्ती पळून गेल्या. त्या सभास्थळाच्या बाहेर जाऊन वक्त्यांचे मार्गदर्शन ऐकत होत्या. वक्त्यांभोवती पिवळे वलय निर्माण झाले होते. सभास्थळी चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. धर्माभिमान्यांमध्ये उत्साह दिसून आला. गुरुदेवांनी पुन्हा मला आकाशमार्गे घरी आणून सोडले. त्यांनी दिलेल्या या अनुभूतीसाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता ! – सौ. नंदा खंडागळे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), नागपूर |


सभेमुळे प्रभावित झालेले धर्माभिमानी म्हणतात !
१. सर्व वक्त्यांची भाषणे कायद्याच्या चौकटीत झाली. अशा सभा देशभरात व्हायला पाहिजेत. – श्री. मनोहर कळलीया, व्यापारी संघटना, माजी अध्यक्ष, चंद्रपूर
२. अकोला येथील हिंदु समाज राष्ट्रासाठी जागृत झाला आहे. या कार्यासाठी तन, मन, धन अर्पण करून प्रत्येकाने सेवा करायला हवी. – श्री. हेमेंद्र राजगुरु, ऑल इंडिया गुजराती समाज, उपाध्यक्ष, महाराष्ट्र आणि गोवा राज्य.
३. मदरसे आणि मशिदी यांना मिळणारे अनुदान कायमस्वरूपी बंद व्हायला पाहिजे. प्रत्येक आतंकवादी मुसलमानच का असतो ? हा कायमस्वरूपीचा प्रश्न आहे. ‘मदरसे हे आतंकवाद्यांचे कारखाने आहेत’, हे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याविरोधात सरकारने कठोर पावले उचलायला हवीत. – श्री. चारुदत्त गोविंदराव टिकले (भारद्वाज), स्वराज पेठ, अकोला.
असे धर्मनिष्ठ अधिवक्ते सर्वत्र हवेत !

१. सभेपूर्वी ‘अकोला बार असोसिएशन’च्या अधिवक्त्यांचा ‘संवाद सभे’त उत्स्फूर्त सहभाग !
सभेपूर्वी श्री. सुनील घनवट यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘अकोला बार असोसिएशन’च्या अधिवक्त्यांसमवेत एका संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला उपस्थित रहाण्यासह हिंदूंचे रक्षण, हिंदु कार्यकर्त्यांची सुरक्षा, धर्मांधांच्या विरोधात कायदेशीर लढण्यासाठी कायदेशीर समूह सिद्ध व्हावा, या अनुषंगाने यात चर्चा झाली. या वेळी सर्व अधिवक्त्यांनी उत्स्फूर्तपणे सिद्ध असल्याचे सांगितले.
२. ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’च्या १०० हून अधिक अधिवक्त्यांच्या वतीने राजासिंह यांना राष्ट्र-धर्म कार्यात कायदेशीर साहाय्याचे आश्वासन पत्र देणारे अधिवक्ते !
अधिवक्ते मुकुंद जालनेकर, श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष अधिवक्ता पप्पू मोरवाल, अधिवक्ता अनिरुद्ध देशपांडे, अधिवक्ता आनंद तायडे, अधिवक्ता राहुल चुटके, अधिवक्ता रवी जुंजाळेकर, अधिवक्त्या रश्मी यादव, अधिवक्त्या (श्रीमती) श्रुती भट
‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ अभियानाचा प्रारंभ !

आज मुली आणि महिला असुरक्षित आहेत. प्रतिदिन त्यांच्यावरील अन्याय-अत्याचाराच्या घटना समोर येतात. त्यांना पळवून नेले जाते. देशभरात मोठ्या प्रमाणात बेपत्ता होणार्या मुलींच्या सुरक्षेच्या उद्देशाने ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ हे अभियान राबवण्याचे ठरवण्यात आले आहे. या अभियानाचा प्रारंभ टी. राजासिंह यांच्या हस्ते करण्यात आला. लवकरच या अभियानाची कार्यवाही करण्यात येणार आहे.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या सदस्यांचा सत्कार !

हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या सदस्यांचा सत्कार टी. राजासिंह यांनी केला. या वेळी समितीचे संयोजक श्री. उदय महा, शिवसेनेचे श्री. योगेश अग्रवाल, उद्योजक श्री. संजय ठाकूर, ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे सदस्य श्री. अरविंद देठे आणि श्री. प्रमोद अग्निहोत्री, श्री. नंदकिशोर मेहेरे,
श्री. श्रीराम पांडे, धर्मप्रेमी श्री. धनंजय मेहसरे, विश्व हिंदु परिषदेचे श्री. राजू मंजुळकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत पिसोळकर आणि श्री. अमोल वानखडे उपस्थित होते.



हिंदुत्वनिष्ठांच्या सत्कारप्रसंगी उपस्थित अन्य हिंदुरक्षक !सर्वश्री चंद्रकांत तुरकुटे, आशिष तिवारी, अंकुश कावडकर, शशांक बैस आणि अनिल गरड |
सभेतील मान्यवर वक्त्यांचा सन्मान आणि स्वागत !



अकोला हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वृत्ताला मिळालेली व्यापक प्रसिद्धी !


• थेट प्रक्षेपण – ए.एन्.एन्. न्यूज, टीव्ही ९ महाराष्ट्र, ‘एबीपी माझा’, आर्.आर्.सी.न्यूज, सकल हिंदु समाज यूट्यूब वाहिनी, दिव्य हिंदी, अजिंक्य भारत, साम टीव्ही, सत्य लढा
• इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे – ए.एन्.एन्. न्यूज, दिव्य हिंदी, सत्य लढा (डिजिटल), सिटी न्यूज, अजिंक्य भारत, महाराष्ट्र टाईम्स (डिजिटल), ‘झी मराठी’ नेटवर्क, एम्.सी.एन्., एल्.एस्. न्यूज, एन्.एन्. न्यूज, एबीपी न्यूज, झी न्यूज
• वृत्तपत्रे – दिव्य मराठी, नवभारत, लोकमत, लोकमत समाचार, देशोन्नती, नवराष्ट्र, तरुण भारत, महासागर, दैनिक भास्कर, अकोला रिपोर्टर, सिटी न्यूज सुपरफास्ट, सकाळ, पुण्यनगरी, अजिंक्य भारत, प्रतिसाद, विदर्भ प्रजासत्ताक, हिंदुस्तान जनमाध्यम, सत्य लढा

सभेच्या माध्यमातून ईश्वरी प्रेरणा अनुभवली ! – अरविंद देठे
अकोला येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभा म्हणजे केवळ एक व्यापक स्तराचे आयोजन नव्हते, तर हिंदु समाजाच्या जागृतीची आणि ईश्वरी प्रेरणेची जणू ती समष्टी अनुभूतीच होती. आम्ही सर्वजण कितीही स्तरांवर प्रयत्न करत असलो, तरी ‘या संपूर्ण कार्यामागे एखादी अदृश्य दिव्य शक्ती कार्यरत आहे’, असे मला जाणवत होते. अनेक सेवा आपोआपच पूर्ण होत होत्या आणि सभाही निर्विघ्नपणे पार पडली.
– श्री. अरविंद देठे, सदस्य, महाराष्ट्र मंदिर महासंघ
सभेचा चित्रमय वृत्तांत पहा . . . एका दृष्टिक्षेपात ! ! ! |


गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !