
अहिल्यानगर – गरोदर महिलांची १० सहस्र रुपयांमध्ये बेकायदा पडताळणी करून गर्भाचे लिंग सांगणार्यांना पोलिसांनी उघड केले. पिंपरी निर्मळ (रहाता) येथील माळरानावर हे केंद्र चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या केंद्राचा बोगसपणा उघडकीस आणण्यासाठी महिला पोलीस कर्मचार्यालाच गर्भवती असल्याचे खोटे नाटक करावे लागले. या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टर, एजंट, पडताळणीसाठी आलेल्या ८ गर्भवती महिलांचे पती, नातेवाईक यांना कह्यात घेतले असून न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. डॉ. राहुल भणगे आणि अभिजित भुसाळ अशी गर्भलिंग निदान करणार्या आरोपींची नावे आहेत. (अवैध गर्भलिंग निदान केंद्र उघडकीस येण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. हे प्रकार कायमस्वरूपी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आणि शिक्षा पोलीस का कृतीत आणत नाहीत ? – संपादक) पोलिसांनी या कारवाईत सोनोग्राफी यंत्र, भ्रमणसंगणक, भ्रमणभाष, कागदपत्रे, रोख पैसे आणि वाहनांसह २४ लाख ९६ सहस्र २०० रुपयांचा माल जप्त केला आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वाती पवार यांच्या तक्रारीवरून डॉक्टरांसह ९ जणांच्या विरोधात ‘महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स कायदा’, तसेच गर्भधारणापूर्व आणि प्रसूती पूर्व निदान तंत्र लिंग निवड प्रतिबंध कायदा १९९४ अंतर्गत लोणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. डॉक्टर आणि दलालाने आत्तापर्यंत किती महिलांच्या गर्भलिंगनिदान चाचण्या केल्या? परजिल्ह्यातील गर्भवती महिलांना या केंद्राची माहिती कशी मिळाली ? ‘गर्भलिंग निदान केंद्रा’मध्ये मुलीचे निदान झाल्यास पुढे काय केले जाते ? याचा शोध पोलीस घेत आहेत. बीड, संगमनेर, नाशिक, नांदगाव, पुणे येथून महिला पडताळणीसाठी येत होत्या.
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त
Shivakumar As Lord Shiva : कन्नड दैनिक ‘विश्ववाणी’ने डी.के. शिवकुमार यांना भगवान शिवाच्या रूपात दाखवले !
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
अंबरनाथ येथे कचर्याच्या ढिगार्यात गोवंशाचे अवशेष आढळले !