
शाहूवाडी (जिल्हा कोल्हापूर) – तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छतेसाठी आणि हात धुण्याच्या हस्तप्रक्षालन पात्राला पाण्याची कोणतीही सोय नाही. त्याच्या खाली असलेले पाणी जाण्याचे नळ तुटलेले आहेत आणि अन्य समस्याही आहेत. तरी तहसीलदार कार्यालय परिसरातील असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेविषयी कार्यवाही करा, या मागणीचे निवेदन हिंदु विधीज्ञ परिषदेच्या वतीने शाहूवाडी तहसीलदार सीमा सोनवणे यांना देण्यात आले. निवेदन स्वाकारल्यावर तहसीलदारांनी संबंधित विभागांना त्वरित यावर कृती करण्याचे आदेश दिले. (नागरिकांना ज्या मूलभूत सुविधा मिळणे अपेक्षित आहे, त्या मिळण्यासाठीही निवेदन का द्यावे लागते ? सर्व यंत्रणा हाताशी असलेले प्रशासन काय करत आहे ? – संपादक)
या प्रसंगी हिंदु विधीज्ञ परिषदेचे श्री. बाबासाहेब भोपळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. चंद्रकांत म्हापसेकर, तसेच ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे श्री. प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
रेल्वेमार्गाने येणार्या बांगलादेशी घुसखोरांचा बंदोबस्त करा ! – सकल हिंदु समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
गुणवत्ता आणि अन्नसुरक्षा यांविषयी ‘गोकुळ’ संघाकडून कधीही तडजोड करण्यात आलेली नाही !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक