‘नोव्हेंबर २०२५ मध्ये गायन, वाद्य आणि नृत्य या कला शिकणार्या महाराष्ट्रातील साधकांसाठी फोंडा (गोवा) येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील आध्यात्मिक संशोधन केंद्रात ‘संगीत-साधना शिबिर’ आयोजित केले होते. या शिबिरात सहभागी झालेल्या शिबिरार्थींसाठी मार्च २०२६ पासून साप्ताहिक ‘ऑनलाईन संगीत सत्संग’ चालू केला आहे. या सत्संगात ‘कलेला साधनेची जोड कशी द्यायची ?’, या अनुषंगाने कला आणि साधना यांच्याशी संबंधित विविध विषय घेतले जातात. या सत्संगात सहभागी होणार्या नेवासा (जिल्हा अहिल्यानगर) येथील कु. संस्कृती शेंदूरवाडकर या साधिकेला ‘संगीत सत्संगा’तून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहोत.

१. ‘नकारात्मक विचार करण्याऐवजी गुरुदेव जे अनुभवायला देत आहेत, ते ग्रहण करायला हवे’, याविषयी आलेली अनुभूती !
गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे मला संगीत-साधना शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळाली. शिबिर झाल्यानंतर काही दिवसांनी आम्हाला साप्ताहिक संगीत सत्संग लाभत आहे. मी सत्संग ऐकण्यासाठी ज्या खोलीत बसते, त्या खोलीत गुरुदेवांचे छायाचित्र आहे. एकदा सत्संग ऐकण्यापूर्वी माझ्या मनात विचार येत होते, ‘मी पुष्कळ वर्षांपूर्वी भरतनाट्यम्चा सराव केला आहे. गुरुदेवांनी आता मला ही संधी का दिली असणार ? माझी तर पात्रता नाही. मी जे शिकले आहे, त्याचा उपयोग होणार नाही.’ त्यानंतर मी गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर त्यांना वाहिलेल्या ३ फुलांपैकी एक फूल खाली पडलेले मला दिसले. त्या वेळी ‘ही अनुभूती आहे’, असे मला वाटले; पण मी बुद्धीने विचार केला, ‘हा योगायोग आहे.’ काही वेळाने गुरुदेवांना वाहिलेली उरलेली २ फुलेही खाली पडली. तेव्हा ‘ही अनुभूती आहे’, याची मला निश्चिती झाली आणि ‘आपण नकारात्मक विचार करण्याऐवजी गुरुदेव जे अनुभवायला देत आहेत, ते ग्रहण करूया’, असे विचार माझ्या मनात आले.
२. सत्संग ऐकतांना खोलीत वार्याची झुळूक येणे आणि तेव्हा गुरुदेवांचे सूक्ष्मातील अस्तित्व जाणवणे
एकदा सत्संग ऐकतांना मी खोलीचे दार आणि खिडक्या बंद केल्या होत्या. तेव्हा मला ‘खोलीत वार्याची झुळूक आली आहे’, असे जाणवले. मला वाटले की, गुरुदेवच सत्संगात उपस्थित आहेत. यातून मला ‘जेथे गुरूंचे कार्य असते, तिथे गुरुदेवांचे अस्तित्व असते’, याची अनुभूती आली.
३. सत्संगानंतर मन सकारात्मक होऊन आनंद अनुभवता येणे
मी सत्संग ऐकण्यापूर्वी कितीही नकारात्मक स्थितीत असले, तरी सत्संगात जाणवणारे गुरूंचे अस्तित्व आणि सत्संगातील दैवी विषय यांच्यामुळे सत्संग झाल्यावर माझे मन सकारात्मक होते आणि मला आनंद अनुभवता येतो.
४. संगीत सत्संगात बोलतांना भीती न वाटता आनंद मिळणे
माझ्या मनात साप्ताहिक ‘संगीत सत्संगा’विषयी वेगळीच उत्सुकता असते. अन्य कार्यक्रमांत मी मनमोकळेपणाने सहभागी होत नसे. मला भीती वाटत असे; परंतु संगीत सत्संगात बोलतांना मला भीती न वाटता आनंद मिळतो.
५. सत्संगामध्ये पुढे येणार्या उत्सवांविषयी माहिती कळल्याने त्या उत्सवांचा आध्यात्मिक लाभ होऊन आनंद मिळणे
आम्हाला संगीत सत्संगात पुढे येणार्या उत्सवांची आणि त्या संबंधित देवतांची महती सांगितली जाते. ‘आपण कलेच्या माध्यमातून त्या उत्सवांचा कसा लाभ करून घेऊ शकतो ?’, याविषयी सांगितले जाते. त्यामुळे आम्हाला देवतांच्या आगमनाची पूर्वसिद्धता करता येते. त्याचा आम्हाला आध्यात्मिक दृष्टीने लाभ होतो. आम्हाला ‘साधनेविषयी आंतरिक प्रयत्न कसे करायचे ?’, हे शिकायला मिळून त्यातून आनंदही मिळतो.’
– कु. संस्कृती शेंदूरवाडकर (वय १८ वर्षे), नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. (२७.४.२०२६)
सरकारला भ्रष्टाचार रोखता न येण्याचे एकमेव कारण म्हणजे इच्छेचा अभाव !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
इतर साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांमधील भेद
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !