
कोलकाता (बंगाल) – शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कंकालीतला मंदिर परिसरात ‘केवळ हिंदूंना प्रवेश’ असे फलक लावण्यात आले होते. ही माहिती सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानंतर त्याला विरोध झाल्यामुळे पोलिसांनी फलक हटवले.
🚩 Police Remove “Only Hindus Allowed” Board at Kankalitala Shaktipeeth in Bengal
🔸 Reports say VHP & Bajrang Dal activists had installed the board to preserve temple sanctity.
🔸 Police acted swiftly to remove it.
What business do non-Hindus have in Hindu Shaktipeeths? Why… pic.twitter.com/Ri3DWx5PJy
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 7, 2026
१. स्थानिक सूत्रांनुसार विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या काही कार्यकर्त्यांनी हे फलक लावल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या मते, मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आणि इतर धर्मियांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
२. या प्रकारामुळे मंदिर समितीने चिंता व्यक्त केली आहे. समितीच्या एका सदस्याने सांगितले, ‘कंकालीतला हे एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक केंद्र आहे, जिथे सर्व धर्माचे लोक श्रद्धेने येतात. अशा प्रकारचे फलक लावणे हे मंदिराच्या परंपरेच्या विरोधात आहे.’ (देवस्थान मंडळातील सदस्यांनाच धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हेच यातून दिसून येते ! – संपादक)
३. प्रशासनाने या प्रकरणाची नोंद घेतली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली. शांतता भंग होऊ नये आणि धार्मिक सलोखा कायम रहावा, यासाठी पोलिसांनी हे फलक हटवण्याचे काम चालू केले आहे.
४. या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जिल्हा प्रशासनाने लोकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. राजकीय वर्तुळातूनही यावर विविध प्रतिक्रिया उमटत असून तृणमूल काँग्रेसने या घटनेचा निषेध केला आहे, तर भाजपने यावर सावध भूमिका घेतली आहे.
कंकालीतला शक्तिपीठाची महती
कंकालीतला हे बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात वसलेले एक अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र धार्मिक स्थळ आहे. हे ठिकाण हिंदु धर्मातील ५१ शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. जेव्हा भगवान विष्णूने त्याच्या सुदर्शन चक्राने माता सतीचे शरीर छिन्नविच्छिन्न केले, तेव्हा तिच्या शरिराचा ‘कंकाल’ (कंबर) या ठिकाणी पडला होता. येथे देवीला ‘देवगर्भा’ किंवा ‘कंकाली’ या नावाने पूजले जाते आणि तिचे रक्षक म्हणून भगवान शिव ‘रुरु’ भैरव रूपात विराजमान आहेत. या मंदिराचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणत्याही प्रकारची पाषाण मूर्ती नाही. त्याऐवजी एका पवित्र कुंडात (तलावात) असलेल्या शिलाखंडांची पूजा केली जाते.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !