
फोंडा, ६ मे – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बांदोडा येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानात ९ ते १५ मे या कालावधीत सकाळी ६.३० ते ८.३० आणि सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत युवक-युवती यांच्यासाठी शौर्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
युवक आणि युवती यांच्यामध्ये स्वसंरक्षणाची भावना आणि धैर्य विकसित करण्ो आणि त्यांना शारीरिकदृष्ट्या सक्षम करणे, या उद्देशाने ‘हर घर योद्धा’ या विशेष अभियानाच्या अंतर्गत या शौर्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १५ वर्षे वयोगटावरील युवक-युवती यांच्यासाठी आहे आणि ते विनामूल्य आहे. शिबिरार्थीं त्यांच्या सोयीनुसार वरील वेळांपैकी कोणतीही वेळ निवडू शकणार आहेत. शिबिरामध्ये लाठी-काठी आणि लाठी युद्ध, दंडसाखळी आणि ‘मिक्स मार्शल आर्ट’ यांसारख्या स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे कौशल्य शिकवले जाणार आहे. इच्छुकांनी https://forms.gle/woS5TdgQmbpMQ7vf8 या गूगल फॉर्मद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी ९३२६१०३२७८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर