सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास बंद
वॉशिंग्टन – अमेरिकेने पेशावर येथील तिचे वाणिज्य दूतावास पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव घेतलेल्या या निर्णयामुळे पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने नुकतेच एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून या निर्णयाची माहिती दिली. पेशावर आणि परिसरातील बिघडलेली सुरक्षाव्यवस्था पहाता, आपल्या कर्मचार्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करू शकत नाही’, असे अमेरिकेने ठणकावून सांगितले आहे.
US Shuts Down Consulate in Peshawar, Pakistan
Amid rising security concerns, the United States has decided to close its consulate in Peshawar.
Diplomatic and political affairs of Khyber Pakhtunkhwa will now be handled directly from the US Embassy in Islamabad
Move signals… pic.twitter.com/Xa9zpOLLGn
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 6, 2026
खैबर पख्तूनख्वा प्रांतातील सर्व कूटनीती आणि राजकीय कामकाज यांचे दायित्व आतापर्यंत पेशावर दूतावासाकडे होते; मात्र आता हे सर्व कामकाज थेट इस्लामाबादमधील मुख्य अमेरिकन दूतावासातून हाताळले जाईल. इस्लामाबाद, कराची आणि लाहोर येथील अमेरिकन दूतावास पूर्वीप्रमाणेच सक्रीय रहातील, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत