बेंगळुरू (कर्नाटक) येथील ‘भूमी जिहाद’च्या विरोधातील लढा !

हिंदु आणि राष्ट्र हितैषी सदर

१. ‘जिहाद’ म्हणजे काय ?

‘जिहाद’ या शब्दाचा संदर्भ हिंदु, ख्रिस्ती, बौद्ध अथवा जैन यांच्या धार्मिक ग्रंथांमध्ये नाही. त्याचा उल्लेख मुसलमानांचे कुराण, सुरा, हदित आणि फतवा, तसेच औरंगजेबाने लिहिलेला आलमगिरी या पुस्तकांमध्ये आढळून येतो. ‘जिहाद’ या शब्दाचा अर्थ संघर्ष किंवा लढा, असा आहे. हा संघर्ष देशातील शेतकर्‍यांचे हित, विद्यार्थ्यांचे कल्याण अथवा समाजातील इतर गटांचे कल्याण यांसाठी करण्यात येणारा संघर्ष नाही, तर तो इस्लामसाठी करत असलेला संघर्ष आहे आणि हे कटू सत्य आहे.

२.  भारतात प्राचीन काळापासून ‘भूमी जिहाद’ कार्यरत

भूमी जिहाद ही संकल्पना भारतियांसाठी आता नवीन नाही. ‘लव्ह जिहाद’ आणि ‘हलाल प्रमाणपत्र’ यांच्या माध्यमातून करण्यात येणारा ‘आर्थिक जिहाद’ या संकल्पना तुलनेने नवीन आहेत; मात्र भारतातील मुसलमान फार प्राचीन काळापासून ‘भूमी जिहाद’ करत आहेत. अयोध्येतील श्रीराममंदिर तोडून तेथे बाबरी मशीद बांधणे, ज्ञानवापी मंदिर पाडून तेथे मशीद असल्याचा दावा करणे, मथुरेतील श्रीकृष्ण मंदिराच्या भिंती पाडून मशीद बांधणे, तसेच श्रीरंगपट्टणम् (मंड्या, कर्नाटक) येथील हनुमान मंदिर नष्ट करून त्यावर मशीद बाधणे इत्यादी अनेक उदाहरणे ही मुसलमानांच्या ‘भूमी जिहाद’चीच आहेत.

३. ‘भूमी जिहाद’च्या विरोधात लढा

अ. बेंगळुरूतील इदगाह मैदानावरील ‘भूमी जिहाद’ संपवण्यात यश : भारतात ‘भूमी जिहाद’च्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ लढा देत आहेत. वर्ष १८९१ पासून आजतागायत बेंगळुरू येथील चामराजपेठ मैदानावर इदगाहची इमारत उभी आहे. सरकारने सध्याच्या इदगाहपासून ४०० ते ५०० मीटर अंतरावर मुसलमानांना दफनभूमीसाठी पर्यायी भूमी उपलब्ध करून दिली आहे. वर्ष १९६४ मध्ये सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यात ‘इदगाहला पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्यावर सध्या असलेली इमारत पाडून ही जागा बेंगळुरू महानगरपालिकेच्या कह्यात द्यावी’, असे म्हटले आहे. असे असतांनाही मुसलमान समाज अजूनही या मैदानात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रीय ध्वज फडकवू देत नाही, तसेच कोणतेही हिंदु सण अथवा सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करू देत नाही.

श्री. एस्. भास्करन्

या मैदानाविषयी माहिती अधिकाराच्या कायद्याखाली याचिका प्रविष्ट केली. त्यानंतर आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या. बेंगळुरू महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांद्वारे ‘हे मैदान इदगाह मैदान नसून ते बेंगळुरू महानगरपालिकेचे सार्वजनिक आतद मैदान आहे’, असे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. याचा अर्थ या भूमीची मालकी बेंगळुरू महानगरपालिकेकडे आहे. ही कागदपत्रे माझ्या कह्यात आल्यानंतर त्यांना मी महापालिकचे मुख्य आयुक्त आणि सहआयुक्त यांना सादर केली. यासमवेतच या मैदानावर देशाच्या स्वातंत्र्याचा ७५ वा महोत्सव साजरा करण्याविषयीही निवेदन दिले आणि राष्ट्रध्वज फडकावण्याविषयी अनुमती मागितली. त्यावर कर्नाटक वक्फ बोर्ड आणि कर्नाटकातील केंद्रीय मुसलमान संघटना ही भूमी त्यांची असल्याचा दावा करू लागल्या.

बेंगळुरू महानगरपालिकेचे मुख्य आयुक्त आणि विभागीय आयुक्त यांनी एक पत्रकार परिषद बोलावली. त्यात त्यांनी हे मैदान शासकीय भूमी असल्याचे सांगितले. वक्फ बोर्ड या मैदानावर राष्ट्रध्वज लावण्यासाठी विरोध करत होता. या पत्रकार परिषदेमुळे ही भूमी शासकीय असल्याचे सिद्ध झाले. या लढ्याला आलेल्या यशामुळे यावर्षी १५ ऑगस्ट या दिवशी या मैदानावर ध्वजवंदन करण्याचा मार्ग खुला झाला.

आ. बेंगळुरू येथील हिंदूंच्या दफनभूमीवर अतिक्रमण : हिंदूंच्या दफनभूमीविषयीचे हे सूत्र आहे. चामराजपेट विधानसभा मतदारसंघामध्ये ही भूमी असून बेंगळुरू शहराच्या मध्यभागी आहे. येथून जमीर अहमद खान हे सलग ४ वेळा आमदार पदी निवडून आले आहेत. या उपविभागात हिंदूंच्या ४ दफनभूमी आहेत. त्यांपैकी २ कानडी लोकांच्या, १ तमिळी हिंदूंची  आणि एक सर्व हिंदूंसाठी आहे. वर्ष २०११ ते २०१९ या कालावधीत येथे ५ सहस्त्र ८०० लोकांचा दफनविधी झाला. काही कारणांनी या भागातील मुसलमान नगरसेवक आणि आमदार यांनी मिळून या दफनभूमीतील ३ सहस्त्र समाध्या खोदून काढल्या अन् त्यांना शहराबाहेर नेऊन टाकले आणि त्यांना पूर्णतः नष्ट केले. हे लक्षात आल्यावर आम्ही माहिती अधिकाराच्या कायद्याच्या माध्यमातून बेंगळुरू महानगरपालिकेचा अभियांत्रिकी, आरोग्य आणि महसूल विभाग यांना अर्ज करून तेथे दफन करण्यात आलेल्या मृतदेहांची आकडेवारी विचारली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ही संख्या ५ सहस्त्र ८०० हून अधिक होती.

हिंदूंमधील लढाऊवृत्तीच्या अभावामुळे मुसलमान हिंदूंवर शिरजोर

हिंदूंमध्ये संघर्ष करण्याची वृत्ती नाही. त्यामुळे मुसलमान समाज त्यांच्यावर शीरजोर झाला आहे. भारतातील असो किंवा भारताच्या बाहेरील मुसलमान ते भारताला इस्लामीस्तान करण्यासाठी कार्य करतात. मुसलमान बहुसंख्यांक असतात, तेव्हा ते ‘दार उल् इस्लाम’च्या (इस्लामचे शासन चालते, असा प्रदेश) नियमाप्रमाणे वागतात आणि इतर धर्मियांना त्यांची कोणतीही धार्मिक कृती करू देत नाहीत. ‘दार उल् इस्लाम’च्या भूमीलगतच्या भूमी या ‘दारूल हरब’ (संघर्षाचे ठिकाण) भूमी म्हणून ओळखल्या जातात आणि त्यांना भविष्यात ‘इस्लामी स्टेट’ बनवले जाते. हिंदूंच्या तुलनेत मुसलमान बहुसंख्य नसतात, तेव्हा पंथाच्या पुस्तकांनुसार कार्य केले जाते. तेव्हा ते आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या भूमी यांची मागणी करतात, तसेच सर्व प्रकारच्या समाजविघातक कारवाया करतात.

– श्री. एस्. भास्करन्

४. ‘भूमी जिहाद’च्या विरोधात ‘माहिती अधिकार कायद्या’चे महत्त्व

‘ज्ञानात शक्ती आहे’, असे स्वामी विवेकानंद म्हणत असत; मात्र सद्यःस्थितीत ‘माहिती हीच संपत्ती आणि शक्ती’ आहे. भारतात ‘माहिती अधिकार कायदा २००५’ लागू आहे. त्याच्या साहाय्याने आवश्यक ती सर्व कागदपत्रे सिद्ध करून आपल्याला ‘भूमी जिहाद’शी लढा देणे शक्य आहे. मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टणम् येथील हनुमान मंदिर अतिशय भव्यदिव्य होते. टिपू सुलतान लहान असतांना खेळत होता. त्या वेळी तेथे एक फकीर आला आणि त्याने टिपूला ‘तू मोठा होशील, तेव्हा हे मंदिर पाडून तेथे मशीद बांध’, असे सांगितले. वर्ष १७८२ मध्ये हैदरअलीच्या मृत्यूनंतर सत्ता हातात आल्यावर िटपूने सर्वप्रथम हे मंदिर पाडून तेथे मशीद बांधली.

आपल्याकडे माहिती अधिकाराच्या माध्यमातून मिळालेली सर्व कागदपत्रे आणि शासकीय राजपत्रकातील नोंदी आहेत. त्यात या मशिदीच्या ठिकाणी पूर्वी हनुमान मंदिर होते, असे स्पष्ट नमूद केले आहे. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी अशा विषयाशी संदर्भात लढा देतांना सर्वप्रथम ‘माहिती अधिकार कायदा २००५’ चा योग्य वापर केला पाहिजे. या कायद्याच्या माध्यमातून आवश्यक कागदपत्रे गोळा करावी आणि त्यानंतर हिंदु समाजाच्या कल्याणासाठी मोठ्या प्रमाणात लढा द्यावा.’

– श्री. एस्. भास्करन्, अध्यक्ष, विश्व सनातन परिषद, बेंगळुरू.