
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सत्संगांत साधकांकडून लहान लहान प्रयोग करून घेऊन त्यांना सूक्ष्मातील स्पंदनांचा अभ्यास करण्यास शिकवणे
‘जिज्ञासा आणि संशोधक वृत्ती असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आतापर्यंत विविध प्रकारचे वैज्ञानिक प्रयोग केले आहेत. पूर्वी ते सत्संग, अभ्यासवर्ग आदी ठिकाणी उपस्थित साधकांकडून लहान लहान प्रयोग करून घेत. याद्वारे त्यांनी साधकांना सूक्ष्मातील जगत् आणि स्पंदने यांचा अभ्यास करायला शिकवले, तसेच साधकांमध्ये योग्य-अयोग्य स्पंदने ओळखण्याची सूक्ष्म दृष्टीही निर्माण केली.
२. भारतात सहस्रो आश्रम, सहस्रो संत, तसेच संप्रदायांत सहस्रो अनुयायी असूनही तेथे साधनेची सूक्ष्मातील शिकवण दिली न गेल्याने जिज्ञासूंना आध्यात्मिक स्वरूपाच्या अनुभूती न येणे
सत्संगात संशोधनात्मक प्रयोग करण्याचे महत्त्व सांगतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितले, ‘‘जगात कुठेही अशा प्रकारचे संशोधन केले जात नाही, तसेच साधकांना येणार्या विविध प्रकारच्या अनुभूतीही अन्य कुणाला येत नाहीत. विदेशात आणि भारतात सहस्रो आश्रम आहेत. सहस्रो संत आहेत. काही संप्रदायांत सहस्रो अनुयायी आहेत; पण सूक्ष्मातील जाणण्याविषयी असे कोण शिकवते का ? अनेक जण व्याख्याने देतात, प्रवचने आणि कीर्तने करतात; पण ते समाजातील लोकांना साधना करायला सांगत नाहीत. त्यामुळे प्रवचने आणि कीर्तने ऐकून जिज्ञासूंना आध्यात्मिक स्वरूपाच्या अनुभूती येत नाहीत.
३. सूक्ष्मातिसूक्ष्म अशा ईश्वरी तत्त्वाची अनुभूती घेण्यासाठी साधकांनी साधनेच्या आणखी पुढच्या टप्प्याला जायला हवे !
सनातनच्या साधकांना येतात, तशा अनुभूतीही अन्य कुणाला येत नाहीत. याचे कारण साधक व्यष्टी आणि समष्टी साधना करत आहेत. साधकांनी आता आणखी पुढच्या टप्प्याला जायला हवे; कारण त्यांना सूक्ष्मातिसूक्ष्म अशा ईश्वराला जाणून घ्यायचे आहे. साधकांना सूक्ष्मातील आणखी थोडे थोडे कळू लागले की, पुढे त्यांना सूक्ष्मातिसूक्ष्म अशा ईश्वरी तत्त्वाची अनुभूती येईल ! यासाठी त्यांनी सूक्ष्मातील अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.’’
सरकारला भ्रष्टाचार रोखता न येण्याचे एकमेव कारण म्हणजे इच्छेचा अभाव !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
इतर साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांमधील भेद