
अहिल्यानगरातील नेवासा तालुक्याच्या सौंदाळा गावातील सरपंचाने त्यांच्या जिवंतपणीच त्यांचा दशक्रिया विधी घालून पिंडदान केले आहे. ‘सामाजिक रूढी आणि अंधश्रद्धा यांना तिलांजली देण्यासाठी हे पाऊल उचलले’, असे त्यांनी म्हटले आहे. ‘स्वतःच्या मृत्यूनंतर कोणतेही सुतक पाळले जाऊ नये किंवा धार्मिक कर्मकांड करू नये. पतीच्या निधनानंतर पत्नीला सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार असून समाजातील जाचक रूढींमध्ये तिला अडकवू नये’, असेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचा दावा करत जिवंतपणी श्राद्ध विधी करणे, हे धर्मशास्त्रानुसार संमत आहे; परंतु सरपंचांच्या या प्रकरणात हे केवळ प्रसिद्धीसाठी केल्याचे लक्षात येते; कारण सरपंचांनी म्हटले की, त्यांच्या पिंडाजवळ पुष्कळ कावळे आले. येथे लक्षात घेण्याचे सूत्र, म्हणजे कुठल्याही अन्नाजवळ अनेक पक्षी येणे, हे नैसर्गिक आणि सामान्य गोष्ट आहे; परंतु पंचपक्वान्न किंवा पिंड यांच्याजवळ अनेक कावळे असूनही ते कित्येकदा विशिष्ट पिंडाला शिवत नाहीत, यावरून त्यातील धर्मशास्त्र लक्षात येते. सरपंच महाशयांनी अंधश्रद्धेच्या नावाखाली रूढींना ‘जाचक’ ठरवले; परंतु त्याच विधीतील ‘कावळा शिवणे’ या संकेताला महत्त्व देत तो विधी पार पडल्याचेही दाखवले, हे विरोधाभासी आहे. मुळात विधी नाकारायचा असेल, तर तो पूर्णतः टाळणे तर्कसंगत ठरले असते; परंतु त्याच विधीचे जिवंतपणी प्रदर्शन करणे, हे सुधारणावादापेक्षा बौद्धिक दिवाळखोरीच अधिक दर्शवते.

मुळात हिंदु धर्मातील अंत्येष्टी आणि मरणोत्तर संस्कार हे केवळ ‘भावनिक खेळ’ नसून ते प्रगत अध्यात्मशास्त्र आहे. मंत्रांच्या विशिष्ट ध्वनीलहरी आणि विधी यांद्वारे मृत जिवाला गती देण्याचे हे शास्त्र विज्ञानाच्याही पलीकडचे आहे. हॉलीवूड अभिनेते सिल्वेस्टर स्टॅलोन यांनी हरिद्वारमध्ये त्यांच्या मुलासाठी केलेले ‘तीर्थ श्राद्ध’ हे याच जागतिक मान्यतेचे प्रतीक आहे. जेव्हा पाश्चिमात्य जग भारतीय अध्यात्मातील शांतता शोधत आहे, तेव्हा आपल्याच देशातील काही अतिशहाणे जिवंतपणी विधी करून त्या शास्त्राचा पोरखेळ करत आहेत ! स्टॅलोन यांनी परंपरेतून मनाची शांती मिळवली, यावरून हे स्पष्ट होते की, परंपरेतील सखोल विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. स्वतःचा मृत्यू पहाणे किंवा त्याचे विधी करणे, हे मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून नकारात्मक विचारांना खतपाणी घालणारे ठरू शकते. हिंदूंच्याच धार्मिक विधींचे वाभाडे काढण्याचे धैर्य दाखवणारे हे तथाकथित सुधारक इतर धर्मियांच्या रूढींविरुद्ध अवाक्षरही काढत नाहीत. पाणी वाचवण्याच्या नावाखाली होळी, प्रदूषण टाळण्यासाठी दिवाळी आणि आता समाजसुधारणेच्या नावाखाली दशक्रिया विधीवर टीका केली जात आहे. ही सुधारणा नसून हिंदु धर्माला पद्धतशीरपणे लक्ष्य करण्याचे षड्यंत्र आहे.
– सौ. अपर्णा जगताप, पुणे
जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका