पुस्तकाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना ‘निधर्मी’ ठरवण्याची केविलवाणी धडपड ! – दुर्गेश परुळकर, हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि व्याख्याते

डोंबिवली (ठाणे) – कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकावरून सध्या वाद चालू आहे. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांना ‘निधर्मी’ ठरवण्याची केविलवाणी धडपड करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि व्याख्याते दुर्गेश परुळकर यांनी व्यक्त केली. कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, पानसरे यांनी पुस्तकात ‘मुसलमान सत्ताधिशांशी शिवाजी महाराजांचे झालेले युद्ध हे धार्मिक युद्ध नव्हते’, असे म्हटले आहे. ‘हे विधान योग्य आहे’, याविषयी सांगतांना त्यांनी आदिलशाह आणि मोगल यांच्यातील युद्धाचा दाखला दिला आहे. शिवरायांसमवेत युद्ध करतांना मुसलमान हिंदु धर्माविरुद्धच लढत होते; पण ‘ते जेव्हा परस्परांच्या विरोधात लढत होते, तेव्हा ते त्यांचे राजकीय युद्ध होते’, असे आपण स्पष्टपणे म्हणू शकतो; कारण आदिलशाह आणि मोगल यांच्यात झालेल्या युद्धात दोन्ही पक्षांकडून एकही मशीद पाडली गेली नाही. हिंदूंशी युद्ध करतांना मात्र हिंदूंची मंदिरे पाडली गेली आणि मूर्तीभंजन करण्यात आले. याकडे गोविंद पानसरे यांनी लक्ष दिले नाही.
तथापि याच पुस्तकात गोविंद पानसरे ‘मुसलमानांनी मंदिरे लुटण्यासाठी मंदिरांवर आक्रमण केले’, असे सांगतात आणि मुसलमानांचा हा दोष झाकण्यासाठी मुसलमानांच्या सत्ताधिशांनी सत्ता प्रस्थापित केल्यावर मंदिरांना देणग्या दिल्याचे दडपून ठेवतात.
अल्लावाचून जगात कोणताही देव श्रेष्ठ नाही, वंदनीय नाही आणि पूजनीय नाही. ‘मुसलमानेतरांवाचून अन्य कोणत्याही धर्मातील व्यक्ती स्वर्गात जाऊ शकत नाही’, या आणि अशा मूलभूत सिद्धांतावर इस्लाम धर्माची स्थापना झाली आहे. त्यामुळे ‘इस्लामी सत्ताधिशांनी मंदिरांना देणग्या दिल्या’, असे जे पानसरे सांगतात, ते तथ्यहीन आहे.
सहिष्णुतेचा अर्थ पानसरे लावतात, तसा छत्रपती शिवाजी महाराजांनी लावला नाही. ‘परधर्माविषयी सहिष्णुता म्हणजे स्वधर्माविषयी उदासीनता’ असा सहिष्णुतेचा अर्थ पानसरे सांगतात, त्याप्रमाणे शिवरायांना अभिप्रेत नाही.
गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता ?’ हे पुस्तक म्हणजे म्लेंच्छसंहारक आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तक नाही.
‘शिवाजी कोण होता ?’ पुस्तकाद्वारे इतिहासाचे विद्रूपीकरण ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

मुंबई – कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले ‘शिवाजी कोण होता ?’ हे पुस्तक म्हणजे जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याचा आणि मूळ इतिहास लपवण्याचा प्रकार आहे. या पुस्तकात महाराजांचा उल्लेख एकेरी आणि द्वेषपूर्ण भावनेने करण्यात आला आहे. प्रत्येक हिंदूने अशा विद्रूपीकरणाचा निषेध केला पाहिजे, अशी ठाम भूमिका ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना मांडली. कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
श्री. रणजित सावरकर पुढे म्हणाले, ‘‘तुळजापूरचे मंदिर कुणी पाडले ?, याचा पुरावा नाही’, असे गोविंद पानसरे पुस्तकात लिहितात. महाराजांच्या समक्ष हयात असलेले कवी भूषण यांनी मात्र याचा उल्लेख केला आहे. ‘शिवभारत’मध्ये याचा उल्लेख आहे. हे सगळे जाणीवपूर्वक दुर्लक्षित करून ‘मुसलमान बादशहा किती थोर होते ?’, हे दाखवण्याचा प्रयत्न गोविंद पानसरे यांनी पुस्तकात केला आहे. चुकीचा इतिहास मांडून हिंदूंना भ्रमित करण्याचे काम केले जात आहे.’’
आमदार संजय गायकवाड यांचा मला अभिमान आहे !
‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होत असतांना कोणत्याही खर्या मराठ्याचे रक्त पेटून उठणे स्वाभाविक आहे. महाराजांच्या अपमानामुळे संतापून त्यांनी काही शब्द उच्चारले असतील, तर ते क्षम्य आहेत. मुळात इतिहासाची मोडतोड करून गोविंद पानसरे यांनी गुन्हा केला आहे. एखादा हिंदु जागृत होऊन इतिहासाच्या विद्रूपीकरणाविरोधात आवाज उठवत असेल, तर त्याचा मला अभिमान आहे. गोविंद पानसरे यांचे हे पुस्तक समाजातून बहिष्कृत होऊन विस्मृतीत जाणेच राष्ट्रहिताचे आहे’, असे श्री. रणजित सावरकर म्हणाले.
‘शिवाजी कोण होता ?’ हे पुस्तक परत प्रकाशित करून त्याचे वितरण करणे, हा सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न ! – वैद्या अश्विनी माळकर, आरोग्यभारती, कोल्हापूर
कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता ?’ हे पुस्तक परत प्रकाशित करून त्याचे वितरण करणे, म्हणजे सामाजिक शांतता बिघडवण्याचा एक प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया आरोग्यभारतीच्या वैद्या अश्विनी माळकर व्यक्त केली. कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना क्रूरकर्मा टिपू सुलतानसमवेत केली होती. कबनूर-इचलकरंजी येथे एका धर्मांध महिलेने छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र फाडले होते. त्यामुळे काही लोक आता कोल्हापूरला शहरी नक्षलवाद्यांचे केंद्र बनवण्याचे प्रयत्न करत आहेत, असेच म्हणावे लागेल. या विकृत मानसिकतेच्या लोकांची पोलीस प्रशासनाने पाळेमुळे खणून काढावीत ! पोलीस प्रशासनाने या संदर्भात अशा कृती करणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. हिंदुत्वनिष्ठांच्या संयमाचा अंत पुरोगाम्यांनी पाहू नये.
नवी मुंबईत महापालिकांच्या शाळेत आता इंग्रजी माध्यमातून बालवाडीचे वर्ग चालू होणार !
शेतकर्यांच्या कर्जमुक्ती योजनेची कार्यवाही आता ऑनलाईन होणार !
मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मिडिया हब’ उभारणार !
आंबिवली (कल्याण) येथील इराणी लोकांकडून बसवर दगडफेक; प्रवासी घायाळ
जिन्यामध्ये थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने काढल्या !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !