प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे चिपळूण ‘स्मार्ट सिटी’ नव्हे, तर ‘स्क्रॅप सिटी’ बनण्याच्या मार्गावर !
अवैध भंगार व्यवसायांविरुद्ध प्रशासकीय अनास्थेचा तीव्र निषेध !

(‘स्मार्ट सिटी’ म्हणजे आधुनिक सुविधांनी सज्ज असे शहर, तर ‘स्क्रॅप सिटी’ म्हणजे टाकाऊ शहर)
चिपळूण – चिपळूण शहर आणि ग्रामीण भागांत फोफावलेले अवैध भंगार व्यवसाय केवळ पर्यावरणासाठीच नव्हे, तर नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि जीवितासाठीही धोकादायक ठरत आहेत; मात्र सर्वेक्षणानुसार ‘अवैध’ ठरूनही या व्यवसायांवर कारवाई करण्याची प्रशासकीय अधिकार्यांची ‘इच्छाशक्ती’ शून्य आहे. या गंभीर उदासीनतेचा निषेध करण्यासाठी १ मे या महाराष्ट्र दिनी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने साखळी उपोषण करण्यात आले.
प्रशासकीय यंत्रणेचा गलथान कारभार !
१. सर्वेक्षण झाले; पण कारवाई शून्य ! : एप्रिल २०२४ मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्वेक्षण करून अनेक भंगार व्यवसाय अवैध असल्याचे स्पष्ट केले होते, तरीही नगरपरिषद आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही.
२. अधिकारी म्हणतात, ‘आम्हाला वेळ नाही !’ : हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या पाठपुराव्यानंतर प्रांताधिकार्यांनी ‘आम्ही वर्षभर व्यस्त आहोत, तुम्ही म्हणाल, तेव्हा कारवाई होणार नाही’, असे दायित्वशून्य उत्तर दिले.
३. कायद्याचे अज्ञान की टाळाटाळ ? : नगर परिषदेचे मुख्याधिकारी ‘कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई करावी ?, हे आम्हाला सांगा’, अशा शब्दांत हतबलता व्यक्त करत आहेत, तर प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचार्यांची कमतरता असल्याचे जुनेच कारण पुढे करत आहे.
‘अवैध भंगार व्यावसायिकांमध्ये ‘आमचे कुणी काही वाकडे करू शकत नाही’, अशी भावना निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या या विलंबामुळे चिपळूणला ‘स्क्रॅप सिटी’ बनवायचे आहे का ?’, असा संतप्त प्रश्न हिंदु राष्ट्र समन्वय समितीने उपस्थित केला आहे.
पुढील आंदोलनाची चेतावणी !
गेल्या ४ महिन्यांपासून जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या हिंदु राष्ट्र समन्वय समितीने स्पष्ट केले आहे की, यापुढे केवळ निवेदने न देता कायदेशीर मार्गाने आणि अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल.
आजच्या साखळी उपोषणाचे नियोजन समितीचे सर्वश्री अनुराग उतेकर, राजेश ओतारी, अजिंक्य ओतारी, आदित्य जोशी, सभापती निहार कोवळे, डॉ. हेमंत चाळके, विलास इंगवले, प्रशांत उतेकर, आशिष आठवले आणि अन्य कार्यकर्त्यांनी केले होते. आजच्या या साखळी उपोषणाला नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ. रूपाली दांडेकर, भाजप शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, विहिंपचे जिल्हा मंत्री धनंजय चितळे, प्रमोद पटवर्धन, पराग ओक, प्रतिष्ठित व्यापारी उमेश काटकर, भाजप जिल्हा कोषाध्यक्ष आशिष खातू, अखिल विश्व गायत्री परिवारचे उमेश महाडिक, गोवळकोट राजे प्रतिष्ठानचे अभय जुवळे, गोरक्षक विक्रम जोशी, सनातन संस्थेचे महेंद्र चाळके, हनुमान प्रासादिक मंडळाचे पांढरी चव्हाण, पिंपळी खुर्द येथील वासुदेव शिंदे, उद्योजक अमित जोशी, श्री. दुर्गाप्रसाद मीरगल, निखिला प्रवीणचंद रतावा आदी शेकडो नागरिकांनी साखळी उपोषणात सहभागी होऊन प्रशासकीय अधिकार्यांच्या दायित्वशून्य भूमिकेचा निषेध व्यक्त केला.
या वेळी नगरसेवक शशिकांत मोदी यांनी ‘हा विषय मार्गी लावण्यात पुढाकार घेऊ’, असे आश्वासन दिले. ‘मुख्याधिकारी यांच्याकडे याविषयी गांभीर्याने पाठपुरावा करण्यात येईल’, असे आश्वासन उपनगराध्यक्षा निखिला प्रवीणचंद रतावा आणि निहार कोवळे यांनी दिले. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन ‘या लढ्यात मी तुमच्या समवेत असून कायदेशीरदृष्ट्या जे काही करता येईल ते करीन’, असे सांगितले.
देवस्थान भूमीसंदर्भात शासकीय देवस्थान समितीची पहिली बैठक पार पडली !
अधिवेशनकाळात विधानभवनातील वाहनतळ व्यवस्था कामचलाऊ !
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’चे नाव अवैध !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथास चांदी लावण्याच्या कामास प्रारंभ !
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
पुणे येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यास १० सहस्र रुपये दंड !