पुलवामामध्ये आतंकवाद्यांच्या साहाय्यकास अटक

मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त

रक्षादलांच्या नियोजित मोहिमेत महंमद उमर मलिक या आतंकवाद्यांच्या साहाय्यकास अटक

पुलवामा (जम्मू-काश्मीर) – पुलवामा जिल्ह्यात सुरक्षादलांच्या एका नियोजित मोहिमेत महंमद उमर मलिक या आतंकवाद्यांच्या साहाय्यकास अटक करण्यात आली.

त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटके जप्त करण्यात आली. तो काचीपोरा येथील रहिवासी आहे. प्राथमिक अन्वेषणात असे संकेत मिळाले आहेत की, त्याचा आतंकवाद्यांना रसद आणि इतर साहाय्य पुरवण्यात सहभागी असावा. सध्या सुरक्षा यंत्रणा त्याची चौकशी करत आहेत.सु

संपादकीय भूमिका

आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍यांना भरचौकात फाशी देण्याचीच शिक्षा केली, तर अन्य कुणाचे असे करण्याचे धाडस होणार नाही !