तेल अविव (इस्रायल) – इस्रायलने लेबनॉनमध्ये असलेले हिजबुल्लाचे २ किलोमीटर लांबीचे २ बोगदे उद्ध्वस्त केले आहेत. लेबनॉनमधील आतंकवादी विचारसरणीचा राजकीय पक्ष असलेल्या हिजबुल्लाने इराणच्या साहाय्याने इस्रायलच्या सीमेपासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावरील कंतारा शहरात हे बोगदे बांधले होते. त्यासाठी त्याला तब्बल १० वर्षे घालवावी लागली होती. २८ एप्रिलला इस्रायलने ४५० टन स्फोटकांचा वापर करून हे बोगदे पूर्णपणे उद्ध्वस्त केले.
🚨 Israel destroys two massive Hezbollah tunnels (2 km each) using 450 tons of explosives 💥
Israeli military says the tunnels were built with support from Iran to conceal large numbers of Radwan Force militants, stockpile weapons, and maintain communication/logistics, enabling… pic.twitter.com/8UAH5pCkTG
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 1, 2026
हे दोन बोगदे आतापर्यंत शोधण्यात आलेल्या बोगद्यांपैकी सर्वांत लांब होते, असे इस्रायली सैन्याने स्पष्ट केले. हे बोगदे २५ मीटर खोलपर्यंत विस्तारलेले होते.
हिजबुल्लाच्या नष्ट झालेल्या बोगद्यांचा मुख्य उद्देश !
इस्रायली सैन्याने सांगितले की, हिजबुल्लाची एक विशेष तुकडी ‘रदवान फोर्सेस’चे आतंकवादी मोठ्या प्रमाणात लपवून ठेवणे आणि त्यांना शस्त्रास्त्रे, दळणवळणाची साधने, तसेच इतर आवश्यक रसद पुरवणे, जेणेकरून त्यांना इस्रायलच्या विविध शहरांवर आक्रमणे करणे शक्य होईल, हे या बोगद्यांच्या उभारणीमागील मुख्य उद्दिष्ट होते.

BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण