
पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (सनातनच्या ११९ व्या (समष्टी संत), वय ६२ वर्षे) : प.पू. गुरुदेव, (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) ‘आपणच सर्व काही करून घेत आहात’, अशी मला अनुभूती येते. मला शारीरिक त्रास होत असला, तरीही त्याची मला जाणीव रहात नाही. सेवा करत असतांना रात्री कितीही उशीर झाला, तरीही मला वेळेचे भान नसते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : साधक तुम्हाला रात्री उशिरा भ्रमणभाष करतात का ?
पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार : नाही. रात्री ११.३० वाजेपर्यंत सत्संग चालू असतो. त्यानंतर दुसर्या दिवशीचे नियोजन इत्यादी करायला १ घंटा द्यावा लागतो. ‘ते नियोजन तुम्हीच करून घेता’, अशी मला सतत अनुभूती येते. मला तुमचे अस्तित्व जाणवते आणि मला असलेल्या शारीरिक त्रासाची मला आठवण रहात नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : पुष्कळच प्रगती आहे !
पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार : कुणी विचारले, ‘प्रकृती कशी आहे ?’, तर ‘मी छान आहे’, असे सांगते. मला इतर काही आठवत नाही. ते सांगता येत नाही. आता ‘साधनावृद्धी आणि साधक निर्मिती’ शिबिर झाले. त्यानुसार ध्येय ठेवून आम्ही साधकांचे गट केले आहेत. संभाजीनगरमध्ये काही साधक व्यष्टी साधनेचा आढावा देत नव्हते. ते आता व्यष्टी साधनेचा आढावा द्यायलाही तयार झाले आहेत. सर्व साधक व्यष्टी साधनेचा आढावा देतील, तर त्यांची व्यष्टी साधना चांगली होऊन समष्टी साधनाही चांगली होईल.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हेसुद्धा शिकवावे लागते ना !
पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार : हो. सतत सांगत रहावे लागते. उत्तरदायी साधकांचा गट करून त्यांना ‘त्यांच्या स्थितीनुसार कसे मार्गदर्शन करू शकतो ?’, असा प्रयत्न करते. दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये प्रसिद्ध झालेले संत आणि सद्गुरु यांचे लेख वाचून त्यांनी कसे प्रयत्न केले त्याविषयी सांगते, तसेच ‘गुरूंचे शिष्यांना शिकवणे आणि गुरु-शिष्य संबंध’ या ग्रंथातील दृष्टीकोन सांगून त्यांना साधनेत पुढे जाता येण्यासाठी प्रयत्न करते. संबंधित साधकांना त्या लेखांवर चिंतन करायला सांगून ते आचरणात आणण्यासाठी त्यांना प्रयत्न करण्यास सांगते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : छान आहे.
पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार : प.पू. गुरुदेव, तुम्हीच सर्वकाही करून घेता !’
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !