२८.४.२०२६ (वैशाख शुक्ल द्वादशी) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्ण वेळ साधना करणारे श्री. राहुल कुलकर्णी यांचा ४७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची लहान बहीण सुश्री रूपाली कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४२ वर्षे) यांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि जाणवलेला पालट पुढे दिला आहे.
श्री. राहुल कुलकर्णी यांना ४७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभेच्छा !

१. कष्टाळू आणि काटकसरी स्वभाव
‘राहुल लहानपणापासून कष्टाळू आहे. त्याने इयत्ता १० वीच्या सुटीपासूनच बाहेरील कामे करणे चालू केले. त्याच्या वैयक्तिक गरजाही मुळातच अल्प आहेत. वर्ष २००३ पासून तो पूर्ण वेळ साधना करत आहे. तेव्हापासून त्याने स्वतःच्या व्ययासाठी म्हणून आई-बाबांकडे कधी पैसे मागितले नाहीत. बाबांनी त्याला कधी पैसे दिले, तरी त्याने ते घेतले नाहीत.
२. ‘मोठा भाऊ’ म्हणून साधिकेवर बंधने न घालता तिला स्वतःचे निर्णय घेण्याची मोकळीक देणे

लहानपणापासून राहुलने मोठा भाऊ म्हणून माझ्यावर कधीच ‘तू अमूक गोष्ट कर किंवा करू नकोस’, अशा प्रकारचे बंधन घातले नाही. आश्रमात आल्यावरही ‘तुला जे योग्य वाटते आणि उत्तरदायी साधक सांगतात, ते तू करू शकतेस’, असे स्वतःचे निर्णय घेण्याची मला मोकळीक दिली आहे.
३. गुरुकार्याची तळमळ
राहुलला काही वेळा आध्यात्मिक त्रास होतो, तरीही तो आश्रमातील विद्युत्संबंधी सर्व सेवा, तसेच त्या संदर्भातील अभ्यास मनापासून करतो. आध्यात्मिक त्रासामुळे त्याच्या सेवेत कधी खंड पडला नाही. यातून त्याची गुरुकार्याविषयीची तळमळ दिसून येते.
४. वडिलांची सेवा मनापासून करणे
दोन वर्षांपासून वार्धक्यामुळे माझ्या बाबांना स्वतःचे आवरण्यासाठी इतरांचे साहाय्य लागत आहे. राहुल त्याच्या सर्व सेवा सांभाळून वडिलांना लागणारे सर्व साहाय्य मनापासून करतो. केवळ ‘वडिलांची सेवा करणे’, असे न करता तो त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्नही करतो.
५. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या आज्ञेचे पालन करून चारचाकी गाडी चालवण्यास शिकणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी एकदा राहुलला चारचाकी गाडी शिकण्यास सांगितले होते; परंतु तेव्हा काही कारणामुळे त्याला ते शक्य झाले नाही. त्यानंतर मात्र तो वडिलांची सेवा, तसेच विद्युत् संदर्भातील सेवा करून गाडी चालवायला शिकला. त्याने रात्रीच्या वेळी चारचाकी गाडी चालवण्याचा सराव केला.
६. राहुल यांच्यामध्ये जाणवणारा पालट
पूर्वीच्या तुलनेत राहुलचा आनंद वाढला आहे आणि तो त्याच्या चेहर्यावरूनही जाणवत आहे. आश्रमातील अन्य साधकही ‘राहुलचा चेहरा पूर्वीपेक्षा चांगला वाटतो’, असे सांगत आहेत.
‘राहुलच्या साधनेतील अडथळे दूर होऊन त्याची साधनेत जलद प्रगती व्हावी’, हीच त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना आहे. ‘प.पू. गुरुदेवांनी मला त्याच्यातील गुण दाखवले आणि त्याच्याकडून शिकण्याची पुन्हा प्रेरणा दिली’, याबद्दल गुरुचरणी कृतज्ञता !’
– सुश्री रूपाली कुलकर्णी (श्री. राहुल यांची लहान बहीण, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४२ वर्षे), ढवळी, फोंडा, गोवा. (४.४.२०२६)
संस्कृत भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व !
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
गुरुस्मरणाचा अद्भुत आनंद देणारा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यमय सत्संग !
म्हातारपणातील कंटाळ्यावर एकमेव उपाय म्हणजे, नामजप करणे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !