भाजपच्या नेत्याच्या मुलाने शाळेतील मैत्रिणीला लग्नाचे आमीष दाखवून लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक उच्च न्यायालयाने एका अंतरिम आदेशात एका भाजपच्या नेत्याच्या मुलाविरुद्ध प्रविष्ट (दाखल) असलेला गुन्हा आणि कनिष्ठ न्यायालयातील खटल्याचे कामकाज यांना स्थगिती दिली आहे. या तरुणावर शाळेतील जुन्या मैत्रिणीला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. न्यायालयाने स्थगिती देतांना आरोपीला पीडित महिला आणि त्यांच्या नात्यातून जन्माला आलेल्या मुलाच्या कल्याणासाठी प्रतिमहा ७५ सहस्र रुपये पोटगी देण्याचे निर्देश दिले आहेत.
१. न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्ता हा त्या मुलाचा जैविक पिता आहे, ही वस्तूस्थिती मान्य करण्यात आली असून चाचणीतही ते सिद्ध झाले आहे.
२. २२ वर्षीय आरोपीने गुन्हा आणि खटला रहित करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. आरोपीने लग्न करण्यास आणि मुलाचे दायित्व स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर पीडितेने वर्ष २०२५ मध्ये तक्रार प्रविष्ट केली होती.
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !