
आसनसोल (बंगाल) – येथे काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. देवदीप चॅटर्जी (वय ४३ वर्षे) असे मृताचे नाव आहे. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी देवदीप यांना अमानुषपणे मारहाण करून त्यांची हत्या केल्याचा आरोप त्यांचे नातेवाईक आणि काँग्रेस नेते यांनी केला आहे.
देवदीप यांच्या पत्नी पियाली चॅटर्जी यांनी सांगितले की, आम्ही २५ एप्रिलला रात्री १ च्या सुमारास एका वाढदिवसाच्या मेजवानीवरून परतत होतो. माझे पती गाडी चालवत होते. आम्ही आमच्या वसाहतीसमोर पोचलो असता, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका मोटारसायकलला आमच्या गाडीचा धक्का लागला. तेथे बसलेले काही स्थानिक तरुण आले आणि त्यांनी आमची गाडी अडवली. माझे पती गाडीतून खाली उतरले आणि क्षमा मागू लागले; पण त्या तरुणांनी वाद घालण्यास चालू केले. ही घटना आमच्या घरासमोरच घडली असल्याने ‘स्थानिक काँग्रेस नेते आणि सोसायटीचे सचिव प्रोसेनजीत पुइतांडी यांना बोलावतो’, असे माझे पती म्हणाले. त्यानंतर परिस्थिती अचानक बिघडली. त्या तरुणांनी माझ्या पतीला मारहाण करण्यास चालू केले. मी आणि माझा मुलगा हात जोडून त्यांना सोडण्याची विनवणी करत होतो; पण ते मारतच राहिले. घटनेनंतर देवदीप यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर गुन्हा नोंदवून पुढील कारवाई केली जाईल.
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची गुंडगिरी चालू आहे ! – राहुल गांधी

या घटनेवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, निवडणुकीनंतर काँग्रेस कार्यकर्ते देवदीप चॅटर्जी यांची तृणमूल काँग्रेसशी संबंधित गुंडांनी केलेली हत्या अत्यंत निंदनीय आहे. बंगालमध्ये आज लोकशाही नाही, तर तृणमूल काँग्रेसची गुंडगिरी चालू आहे. निवडणुकीनंतर विरोधी आवाज दडपण्यासाठी त्यांना धमकावणे, मारणे आणि संपवणे हेच आता तृणमूलचे चारित्र्य बनले आहे. (भाजप कार्यकर्त्यांची हत्या होत असतांना राहुल गांधी यांनी एकदाही त्या विरोधात आवाज उठवला नाही. जर उठवला असता, तर कदाचित् त्यांच्या कार्यकर्त्याची हत्या झाली नसती ! – संपादक)
कांग्रेस के कार्यकर्ता देबदीप चटर्जी की चुनाव बाद TMC से जुड़े गुंडों द्वारा की गई हत्या बेहद निंदनीय है। शोकाकुल परिवार के प्रति मेरी गहरी संवेदनाएँ।
पश्चिम बंगाल में आज लोकतंत्र नहीं, TMC का गुंडा राज चल रहा है। वोट के बाद विरोधी आवाज़ों को डराना, मारना, मिटाना – यही TMC का… https://t.co/kQn4T9deL0
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 26, 2026
स्थानिक काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे की, मारहाण करणारे तृणमूल काँग्रेसचे नगरसेवक अनिमेश दास यांचे निकटवर्तीय आहेत. यावर अनिमेश दास यांनी म्हटले आहे की, ते शहराबाहेर असून त्यांना या घटनेबद्दल कोणतीही माहिती नाही.
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !