भ्रमणभाषच्या आधारे संपर्क करून किंवा लघुसंदेश पाठवून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढतच आहे. तात्कालिन सामाजिक समस्या, नागरिकांची अगतिकता, अज्ञानीपणा, भोळेपणा आदी कारणांनी समाजातील अनेक दुष्प्रवृत्ती लुबाडणूक करत असतात. अशाच प्रकारे पुढील काही कारणांसाठी आधारकार्ड क्रमांक, ‘ए.टी.एम्.’ चा पिन (संकेतांक)’, ‘ओटीपी’ मागून किंवा पाठवलेली लिंक ‘क्लिक’ करण्यास सांगून नागरिकांची फसवणूक यापूर्वीही करण्यात आली होती अन् अजूनही होत आहे.
‘महानगर गॅस’चा ‘लोगो (बोधचिन्ह)’ वापरून केली फसवणूक !
सध्या आखाती प्रदेशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याच्या परिस्थितीचा अपलाभ घेऊन पाईपगॅसचा पुरवठा बंद करत असल्याची बतावणी करून ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार घडले आहेत. मुंबईतील एका धर्मप्रेमी महिलेच्या भ्रमणभाषवर नुकताच ‘महानगर गॅस’चा ‘लोगो’ असलेला एक व्हॉट्सअप संदेश आला. त्यामध्ये ‘तुमचा पाईपगॅस रात्री १०.३० वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहे. गॅस चालू ठेवायचा असल्यास संपर्क करावा’, असे त्यात दिले होते.
त्या धर्मप्रेमी महिलेने संदेशामध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क केला असता पलीकडून एक लिंक पाठवून एक ‘ॲप’ डाऊनलोड करण्यास सांगितले आणि पाईपगॅस चालू रहाण्यासाठी १२ रुपये भरण्यास सांगितले. त्यांनी सांगितलेले ॲप डाऊनलोड झाल्यावर महिलेचा भ्रमणभाषचा ‘एक्सेस’ संबंधितांना प्राप्त झाला आणि त्यांना भ्रमणभाष तेथूनच वापरता येऊ लागला. या वेळी १२ रुपये पाठवतांना महिलेने टाकलेला ऑनलाईन ‘पेमेंट’चा पासवर्ड त्यांनी पाहिला आणि महिलेच्या खात्यातून ९९ सहस्र रुपये स्वत:कडे ऑनलाईन पद्धतीने वर्ग केले. त्यानंतर महिलेच्या मुलासमवेत असलेल्या संयुक्त खात्यामधून अनुक्रमे २५ सहस्र रुपये आणि ७५ सहस्र रुपयेही वर्ग केले. एवढ्यावरच न थांबता फसवणूक करणार्याने अन्य दिवशी २ लाख ६५ सहस्र रुपये आणि ११ एप्रिल या दिवशी ९८ सहस्र रुपये अशा प्रकारे पैसे महिलेच्या खात्यातून स्वत:च्या खात्यात वर्ग करण्यासाठी सूचना देऊन ठेवली. हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यावर त्या धर्मप्रेमी महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि अधिकोषात जाऊन खाती बंद केली; परंतु त्यापूर्वी फसवणूक करणार्याने स्वत:च्या खात्यात १ लाख ९९ सहस्र रुपये ऑनलाईन वळते केले होते.

इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?