वेंगुर्ला येथे हिंदवी स्वराज्याच्या ध्वजस्तंभाचे लोकार्पण

वेंगुर्ला – भारत देशाचा राष्ट्रध्वज हा भगवा आहे. हिंदुस्थानाचे फसलेले स्वातंत्र्य पुन्हा एकदा प्राप्त करून देण्यासाठी जिथे जिथे सूर्योदय होतो, त्या प्रत्येक गावात हिंदवी स्वराज्याचा ध्वजस्तंभ फडकला गेला पाहिजे, असे वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य पू. संभाजीराव भिडे यांनी वेंगुर्ला येथे हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाच्या लोकार्पणप्रसंगी केले.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, वेंगुर्ला आणि विविध हिदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने वेंगुर्ला शहरातील कॅम्प येथे असलेल्या ‘त्रिकोणी गार्डन’ परिसरात हिंदवी स्वराज्याचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. या ध्वजस्तंभाचे लोकार्पण २५ एप्रिलला पू. भिडे गुरुजींच्या मंगलहस्ते करण्यात आले.
पू. गुरुजींचे दिशादर्शन !
या वेळी पू. गुरुजी म्हणाले, ‘‘हा हिंदवी स्वराज्याचा ध्वजस्तंभ आहे. त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावास्येला या ध्वजस्तंभासमोर एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना आदरांजली वहावी.’’
या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रणव वायंगणकर, प्रीतम सावंत, सदानंद गिरप, आकांक्षा परब, अधिवक्ता सुषमा प्रभूखानोलकर, पंचायत समिती सभापती शंकर घारे, भाजपचे तालुका अध्यक्ष पपू परब, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख मंगेश पाटील, तालुका कार्यवाह प्रज्वल कोयंडे, संदीप कोयंडे, नित्यानंद आठलेकर, अभिषेक वेंगुर्लेकर, सामाजिक कार्यकर्ते अजित राऊळ, माजी नगराध्यक्ष जगन्नाथ सावंत यांच्यासह अनेक हिंदु धर्मप्रेमी उपस्थित होते.
प्रारंभी पू. भिडे गुरुजी यांनी विधीवत् पूजन झाल्यावर ध्वज फडकावला. या वेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘भारत माता की जय’, ‘वन्दे मातरम्’ आदी घोषणा देण्यात आल्या.
२७ जून : शिवराज्याभिषेक (हिंदुसाम्राज्य) दिन !
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !