
१. पाश्चात्त्यांच्या संपर्कात वैदिक धर्म आणि संस्कृतीत इतके पालट झाले असले, तरी हिंदु समाजाने चिरस्थायी स्वरूपात काही अंगे सांभाळणे
‘गेल्या २०० वर्षांत पाश्चात्त्यांच्या संपर्कात वैदिक धर्म आणि संस्कृतीत इतके पालट झाले की, ‘तो जिवंत आहे, असे म्हणता यायचे नाही’, असा अर्वाचीन पुरोगामी हिंदूंचा आक्षेप आहे. आजच्या औद्योगिक संस्कृतीच्या भीषण आपत्तीतही वैदिक म्हणजे, हिंदु समाजाने चिरस्थायी स्वरूपात काही अंगे सांभाळली आहेतच. आतला माणूस कायम आहे. पोशाख तेवढा पालटलेला आहे. पोशाख पालटला की, ‘माणूस मरतो का ?’
२. धर्मनिरपेक्ष हिंदूला स्वतःच्या जिवंतपणाची निश्चिती नसतांना त्यांना हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर बोलण्याचा अधिकार नसणे
धर्मनिरपेक्ष वा पुरोगामी हिंदु अशा अर्धवटाला ‘हिंदु समाज मेला आहे’, असे वाटते. तसे उघड न बोलता त्या हिंदु समाजाच्या नावाखाली त्यांना हवी ती सुबत्ता निर्माण करायची असते. ‘न हिन्दुर्न यवनः ।’ म्हणजे ‘हिंदूही नाही आणि यवनही नाही’, अशा या निधर्मी हिंदूला स्वतःच्या जिवंतपणाची निश्चिती नाही. अशांना हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर तोंड उघडण्याचा काय अधिकार ? आणि लोकांनी तरी या मृत पिंडाचे का ऐकावे ?’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (मासिक ‘घनगर्जित’, मे २०२२)
क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !