‘सुराज्य अभियाना’ची वाराणसीच्या जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – विद्यार्थ्यांमधील वाढत्या डिजिटल व्यसनाला आळा घालण्यासाठी कर्नाटकचा आदर्श घेऊन उत्तरप्रदेशामध्ये ‘स्क्रीन टाईम’वर (भ्रमणभाष, संगणक पहाण्याचा कालावधी) मर्यादा घालाव्यात, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी येथील जिल्हाधिकारी सत्येंद्र कुमार यांच्याकडे या निवेदनाची प्रत देण्यात आली.
समितीच्या निवेदनानुसार विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या व्यतिरिक्त ‘स्क्रीन टाईम’ प्रतिदिन १ घंट्यापर्यंत मर्यादित ठेवावा आणि सायंकाळी ७ वाजल्यानंतर संगणकीय ज्ञानजाल वापरावर बंदी घालावी. कर्नाटकमध्ये २५ टक्के किशोरवयीन मुलांना संगणकीय ज्ञानजालाचे व्यसन आहे. यामुळे झोपेची समस्या, चिंता आणि एकाग्रतेचा अभाव वाढत आहे. गोवा सरकार १६ वर्षांखालील मुलांच्या समाजमाध्यमे वापरावर बंदी घालण्याचा विचार करत आहे आणि या प्रस्तावावर विचार करण्यासाठी एक समिती नेमण्याविषयी चर्चा चालू आहे.
निवेदनातील अन्य मागण्या !
१. डिजिटल वापराचे राज्यस्तरीय धोरण सिद्ध करणे
२. विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व्यवस्था राबवणे
३. १६ वर्षांखालील मुलांना सामाजिक माध्यमे वापरण्याविषयी नियम घालून देणे
४. पालक-शिक्षक यांना ‘नो-फोन झोन’ (भ्रमणभाषमुक्त क्षेत्र)साठी प्रशिक्षण देणे


हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !