गरीब रुग्णांच्या नातेवाइकांचे आमिषे दाखवून धर्मांतर !

पुणे – येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या उपअधीक्षकांसाठी राखीव असलेल्या शासकीय निवासस्थानात चक्क ‘चर्च’ चालवले जात आहे. या संपूर्ण प्रकाराला रुग्णालयाचे अधीक्षक उत्तरदायी असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. या ठिकाणी केवळ प्रार्थनासभाच होत नसून राज्याच्या कानाकोपर्यातून आलेल्या गरीब रुग्णांच्या नातेवाइकांना आर्थिक आणि भावनिक आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. ‘तुमचा रुग्ण बरा केला जाईल’, ‘तुमच्या मुलांचे शिक्षण पूर्ण करू’, ‘तुम्हाला नोकरी लावून देऊ’, अशी आमिषे दाखवली जात आहेत.
🚨 Church Inside Government Quarters? Shocking Conversion Conspiracy Exposed! 🚨
A ‘Church’ was being run inside the official government residence meant for the Deputy Superintendent of Yerwada Mental Hospital, Pune!
Poor patients’ families were lured with inducements to enable… pic.twitter.com/lQjRwLKe9v
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 23, 2026
सामाजिक कार्यकर्ते शशिकांत साटोटे यांनी सांगितले की, १३८ एकर भूमीचे पालकत्व असतांनाही अधीक्षकांच्या नाकाखाली शासकीय बंगल्यात ‘चर्च’ चालवले जाते आणि तिथे धर्मांतराचे जाळे विणले जाते, ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे. या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी.
येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक श्रीनिवास कोलोड यांनी सांगितले की, सदर ठिकाणी प्रार्थनास्थळ चालवले जात असल्याची कुणकुण आम्हाला ३-४ महिन्यांपूर्वी लागली होती. (मग इतके दिवस कारवाई का केली नाही ? – संपादक) त्याविषयी संबंधित व्यक्तीला समजही दिली होती. सदर व्यक्ती मनोरुग्णालयाची कर्मचारी असून गेली १५ ते १६ वर्षे झाली ती तिथे रहात आहे. असे काही घडत असेल, तर सदर बंगला रिकामा करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. (शासकीय मालमत्तेचा अपवापर होत असतांना प्रशासन संबंधितांना केवळ समज देऊन सोडून देते, यावरून प्रशासनाचे या प्रकाराला मूकसमर्थन आहे का ?, अशी शंका येते. १५ ते १६ वर्षे तेथे रहाणारा कर्मचारी जर असे अनधिकृत कृत्य करत असेल, तर आतापर्यंत त्याच्यावर कठोर कारवाई का झाली नाही ? – संपादक)
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
मोरगाव (पुणे) येथे ‘हरि ॐ तत्सत्’ परिवार, फोंडशिरस (ता. माळशिरस) यांच्याकडून ३३ आदर्श माता-पित्यांचा सत्कार !