वाराणसीच्या जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – नाशिक येथील एका बहुराष्ट्रीय आस्थापनातील महिला कर्मचार्यांवरील लैंगिक छळ आणि अन्य प्रकारच्या गैरप्रकारांची चौकशी व्हावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अन् राष्ट्रीय महिला आयोग यांच्यासाठी जिल्हाधिकारी सत्येंद्र कुमार यांना निवेदन दिले. या प्रकरणात ‘आयटी’ आणि बहुराष्ट्रीय आस्थापनांची विशेष पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या वेळी ‘वाराणसी व्यापारी मंडळा’चे अध्यक्ष श्री. अजितसिंह बग्गा, व्यापारी मंडळाचे महासचिव श्री. कविंद्र जयस्वाल, ‘चौरसिया व्यापारी मंडळा’चे अध्यक्ष श्री. सुनील चौरसिया, ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’चे निमंत्रक अधिवक्ता अरुण कुमार मौर्य, तसेच या समितीचे सदस्य अधिवक्ता संजीवन यादव, अधिवक्ता अवनीश राय, श्री. सुनील गुप्ता आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन केशरी उपस्थित होते.
निवेदनातील अन्य मागण्या !
१. आस्थापनांच्या भरती प्रक्रियेची पडताळणी करणे
२. अंतर्गत तक्रार समिती निष्क्रीय ठेवल्यास कारवाई करणे
३. संबंधित अधिकारी आणि संचालक यांच्यावर गुन्हा नोंदवणे
४. राष्ट्रीय महिला आयोगाने हस्तक्षेप करून मार्गदर्शक तत्त्वे घोषित करणे
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !