भगवद्गीतेचा महिमा !

१. मी गीतेचा आश्रय घेतो. गीता हे माझे सर्वश्रेष्ठ घर आहे. गीतेच्या ज्ञानाचा आधार घेऊनच मी तिन्ही लोकांचे पालन करतो. – भगवान श्रीकृष्ण

२. गीतेचे चांगल्या प्रकारे श्रवण, कीर्तन, मनन आणि ध्यान करायला पाहिजे; कारण ती स्वतः पद्मनाभ भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघाली आहे. त्यामुळे अन्य शास्त्रांचे स्पष्टीकरण घेण्याची आवश्यकता काय आहे ? –  महर्षि वेदव्यास

३. गीताशास्त्राचा अर्थ समजून घेतल्यावर सर्व पुरुषार्थांची सिद्धी होते. – जगद्गुरु आद्यशंकराचार्य

४. मानवाने प्रतिदिन गीतेचे वाचन केल्यामुळे त्याच्या मनात नवनवीन भाव उत्पन्न होत रहातात. त्यामुळे तो माणूस सदैव नित्य, नवीन होत रहातो आणि एकाग्र चित्त होऊन श्रद्धा-भक्ती यांसहित विचार केल्यामुळे गीतेच्या पदोपदी दडलेल्या परमरहस्याची त्याला प्रत्यक्ष प्रचीती येते. गीता, म्हणजे उपनिषदांच्या बागेतील सुंदर पुष्पांचा गुच्छ आहे. – स्वामी विवेकानंद

(साभार : मासिक ‘कल्याण’, डिसेंबर २०२२)