अमेरिकेचे विक्षिप्त राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचे संतापजनक विधान !

वॉशिंग्टन (अमेरिका) – स्थलांतरित लोक चीन, भारत किंवा या पृथ्वीवरील इतर कोणत्याही ‘नरकसदृश’ ठिकाणांहून अमेरिकेत येतात; इथे मुले जन्माला घालतात, जी अमेरिकेचे नागरिक होतात. त्यानंतर ते चीन किंवा भारत येथून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला येथे बोलावून घेतात, असे सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी ‘जन्मसिद्ध नागरिकत्व’चे सूत्र पुन्हा चर्चेत आणले आहे. या प्रकरणात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात त्याच्या व्याप्तीवर सुनावणी चालू आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही पोस्ट करत वरील विधान केले आहे.
“Immigrants come to the US from China, India, or other ‘hell-hole’ places.” – controversial statement by U.S. President Donald Trump.
It is evident from countries like Afghanistan, Syria, and Iran that the U.S. has spent years turning nations into ‘hell-like’ places.
Therefore,… pic.twitter.com/5wKVEgDyiT
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 23, 2026
(म्हणे) ‘अमेरिकेला स्वतःची ‘प्रतिष्ठा’ गमवावी लागेल !’
जन्मसिद्ध नागरिकत्वाविषयी येऊ घातलेल्या निकालावर ट्रम्प म्हणाले की, जर त्यांनी जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या सूत्रावर देशाच्या विरोधात निकाल दिला आणि तसे होण्याचीच शक्यता अधिक आहे, तर अमेरिकेला प्रचंड आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल; परंतु त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, अमेरिकेला स्वतःची ‘प्रतिष्ठा’ गमवावी लागेल. (ट्रम्प यांनी अमेरिकेची उरलीसुरली प्रतिष्ठ धुळीला मिळवलेली आहे, त्यामुळे गमावण्यासाठी तिच्याकडे काही शेष नाही ! – संपादक)
ट्रम्प पुढे म्हणाले की, ‘जोपर्यंत इथे निश्चित काय चालले आहे, याची जाणीव झाली नव्हती, तोपर्यंत भारतियांचा मी एक मोठा समर्थक होतो.’ यासमवेतच ट्रम्प यांनी एक व्हिडिओचा संदर्भ दिला आह. यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अमेरिकेच्या काही भागांमध्ये, विशेषतः कॅलिफोर्नियाच्या तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरभरती प्रक्रियेवर भारतियांचे वर्चस्व आहे. ही गोष्ट मला निश्चितपणे ठाऊक असून यावर माझ्याशी कुणीही वाद घालण्याची आवश्यकता नाही.
ट्रम्प यांनी केलेले दावे कोणत्याही पुराव्याविना मांडण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan