
लंडन (ब्रिटन) – येथे भाड्याच्या घरांच्या संदर्भात एक गंभीर प्रकार समोर आला आहे. एका राष्ट्रीय वृत्तपत्राच्या चौकशीत असे दिसून आले की, काही घरमालक धर्म, जात आणि भाषा यांच्या आधारे उघडपणे भेदभाव करत आहेत.
सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह विज्ञापने
फेसबुक आणि टेलिग्राम यांसारख्या सामाजिक माध्यमांवर ‘केवळ मुसलमानांसाठी’ ‘मुसलमान मुलींसाठी’ किंवा ‘मुसलमानांना प्राधान्य’ अशा आशयाची सहस्रो विज्ञापने दिले जात असल्याचे आढळून आले. हे ‘समानतेचा कायदा २०१०’ या ब्रिटनमधील भेदभावविरोधी कायद्याचे उल्लंघन मानले जाते.
🚨 “Muslims Only” Rental Ads Spark Controversy in London 🇬🇧
Thousands of ads on platforms like Facebook & Telegram reportedly say: “Muslims only”, “for Muslim girls”, or “Muslims preferred” – raising concerns over violations of UK anti-discrimination laws ⚖️
When housing bias… pic.twitter.com/IubdYngwQi
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 24, 2026
धर्म, भाषा आणि प्रदेश यांवर आधारित अटी
काही विज्ञापनांमध्ये ‘केवळ हिंदू’, ‘गुजराती बोलणारे’, ‘केवळ पंजाबी युवक’ अशा अटी घालण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी तर हरियाणा किंवा केरळ राज्यांमधील लोकांसाठीच खोल्या राखीव ठेवल्याचेही दिसून आले.
नकार आणि गैरवर्तन यांची उदाहरणे
बार्किंग परिसरात एका मुसलमानेतर व्यक्तीने ‘केवळ मुसलमानांसाठी’ असलेल्या खोलीविषयी चौकशी केली असता घरमालकाने त्याला सरळ नकार देत ‘इथून निघून जा’ असेही म्हटल्याचा आरोप आहे.
कायदेशीर कारवाईची शक्यता
समानता आणि मानवाधिकार आयोगाने स्पष्ट केले आहे की धर्म, वंश किंवा लिंग यांच्या आधारावर भेदभाव करणे अवैध आहे. अशी विज्ञापने देणार्या घरमालकांवर दंड आणि इतर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
तक्रारीनंतर फेसबुकने अशी अनेक विज्ञापने आणि पाने हटवली आहेत.
सरकारची भूमिका
यूके सरकारने स्पष्ट केले आहे की, धर्म किंवा समुदाय यांच्या आधारावर होणारा भेदभाव सहन केला जाणार नाही आणि याविरोधात कठोर कारवाई केली जाईल.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
US Indians Deportation : अमेरिका १८ सहस्र भारतीय नागरिकांना देशाबाहेर काढणार !
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
वाहनचालकांच्या जिवाशी खेळ खपवून घेणार नाही ! – महसूल राज्यमंत्री योगेश कदम