‘२६.१२.२०२४ या दिवशी जानका गुणवंत ठाकूर यांचे निधन झाले. त्यांच्या मुलीला त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. प.पू. भक्तराज महाराज यांच्याप्रती दृढ श्रद्धा असणे आणि कठीण परिस्थितीतही दुःखी न होणे
‘आमची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती; पण आईने तिचे दुःख कधीच कुणाला सांगितले नाही. मी कधी आईकडे पैसे मागितले, तर ती तिच्या जवळचे पाकीट माझ्या पुढे करत असे आणि त्यातून मला पैसे घ्यायला सांगत असे. तेव्हा तिच्या पाकिटात पैसे नसायचे. तिच्या पाकिटात प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र असायचे. त्या छायाचित्राकडे पाहून ती म्हणायची, ‘‘हाच आपल्यासाठी सर्वांत मोठा ‘चेक’ आहे.’’ कितीही कठीण परिस्थिती आली, तरीही ती कधी दुःखी झाली नाही.
२. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग मिळावा’, याची आईला असलेली तळमळ
२ अ. आईने ‘रामनाथी आश्रमात जायचे आहे’, असे सांगणे आणि तिला ‘तिकडे जाण्यासाठी पैसे नाहीत’, असे सांगणे, उत्तरदायी साधकांना रामनाथी आश्रमात जाण्याविषयी विचारल्यावर त्यांनी ‘तुमचे रामनाथी आश्रमात जाण्याचे आणि तेथून देवद आश्रमात परत येण्याचे रेल्वेचे आरक्षण केले आहे’, असे सांगणे : आईचा प.पू. डॉ. आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांच्या प्रती पुष्कळ भाव होता. माझ्या वडिलांचे निधन झाल्यावर आई माझ्या समवेत देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात काही दिवस रहाण्यासाठी आली होती. एकदा आई मला म्हणाली, ‘‘रुक्मिणी, मला प.पू. डॉक्टरांना भेटायचे आहे.’’ मी आईला म्हणाले, ‘‘उत्तरदायी साधकांना विचारते.’’ आईने पुन्हा त्या संदर्भात विचारल्यावर मी पुन्हा उत्तरदायी साधकांना विचारले. ‘आईने पुन्हा हट्ट करू नये’, यासाठी मी तिला खोटेच सांगितले, ‘‘तिकडे जायला १ सहस्र रुपये लागतील. माझ्याकडे नाहीत’’; मात्र देवाची लीला निराळीच होती. उत्तरदायी साधकांनी मला सांगितले, ‘‘तुम्ही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाऊ शकता. तुमचे जाण्याचे आणि येण्याचे रेल्वेचे आरक्षण केले आहे. काळजी करू नका.’’
२ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आईला प्रसाद देणे : आम्ही (मी आणि आई) देवद आश्रमातून गोवा येथे गेलो. आम्ही तेथून निघत असतांना गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) माझ्या आईला प्रसाद दिला, तेव्हा गुरुदेवांची माझ्या आईवरील कृपा माझ्या लक्षात आली. ‘आईला गुरुदेव देणार नाही, तर कोण देणार ?’, असे मला वाटले.
२ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आईचे केलेले कौतुक : ‘मला वाटायचे ‘आईची काय सेवा होते ?’ आश्रमात राहून करतात ती सेवा !’ माझ्या आईने घरातील सर्व कामे करत माझ्या वडिलांची मनोभावे सेवा केली. गुरुदेव एकदा मला म्हणाले, ‘‘तुझ्या आईची चांगली सेवा होते.’’

३. आईला आलेल्या अनुभूती
३ अ. आई प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीजवळ बसून नामजप करत असतांना तिला ‘प.पू. भक्तराज महाराज गाडी चालू करत आहेत आणि तिच्याकडे पाहून हसत आहेत’, असे दृश्य दिसणे : वर्ष २०११ मध्ये आई देवद आश्रमात आली होती. तेव्हा एकदा ती प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीजवळ बसून नामजप करत होती. तेव्हा अकस्मात् गाडीचे ‘हेडलाईट’ लागले आणि आईच्या डोळ्यांवर प्रकाश पडला. आईने डोळे उघडून गाडीकडे पाहिले. तेव्हा तिला ‘प.पू. भक्तराज महाराज गाडी चालू करत आहेत आणि तिच्याकडे पाहून हसत आहेत’, असे सूक्ष्मातून दृश्य दिसले.
३ आ. एकदा आईला सूक्ष्मातून दिसले, ‘आश्रमातील आम्ही रहात होतो, ती खोली पाण्याने भरली आहे आणि त्यात श्रीकृष्ण डुंबत आहे.’
३ इ. यजमान रुग्णालयात असतांना आईने प्रार्थना केल्यावर तिला ‘शेजारी गणपति आणि मारुति बसले आहेत’, असे सूक्ष्मातून दिसणे : माझ्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आल्यावर आई त्यांना रुग्णालयात घेऊन गेली होती. तेव्हा तेथे रात्री आईला झोप येत नव्हती. तेव्हा ती श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांना प्रार्थना करत होती, ‘मला तुमच्याविना कुणी नाही. ना भाऊ, ना मुलगा, ना आई-वडील !’ तेव्हा तिला ‘तिच्या शेजारी सूक्ष्मातून गणपति आणि मारुति बसले आहेत’, असे दिसले. ते आईला म्हणाले, ‘घाबरू नको. आम्ही तुझे लहान भाऊ आहोत. चिंता करू नको.’
३ ई. आर्थिक परिस्थिती चांगली नसणे आणि एक मासाचा कुटुंबाचा व्यय भागेल, इतके पैसे मार्गात सापडणे : आमची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. आईला मार्गात १ मासाचा कुटुंबाचा व्यय भागेल, इतके पैसे सापडत असत. तेव्हा आई सांगायची, ‘‘कुणाचे पैसे असतील, तर त्यांना देऊ’’; मात्र कुणी पैसे मागायला येत नसे. त्या वेळी ती म्हणायची, ‘‘मला प.पू. डॉक्टरांच्या कृपेने पैसे मिळतात.’’ एकदा आम्ही दोघी आश्रमात असतांना आईला शेतात काम करण्यासाठी १० मजुरांना देण्याइतके पैसे मार्गात सापडले होते. तेव्हा आई म्हणाली, ‘‘तुम्ही आश्रमात सेवा करा. मी शेतातील कामे पहाते.’’
३ उ. एकदा आमच्याकडे विजेचे देयक भरण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा ‘तुमचे विजेचे देयक भरले आहे’, असे आम्हाला कळवण्यात आले.
४. कीर्तन ऐकायला देवळात गेल्यानंतर विठ्ठलाच्या चरणांजवळ प्राणत्याग करणे
६.१२.२०२४ या दिवशी (त्या दिवशी मार्गशीर्ष गुरुवार आणि एकादशी होती.) आई मला म्हणाली, ‘‘शेजारच्या गावी कीर्तन ऐकायला जाते.’’ आई देवळात गेली असतांना कीर्तन चालू झाले. तिने कीर्तनकारांच्या पाया पडून त्यांना नमस्कार केला. त्यानंतर आई प्रसाद घेण्यासाठी तेथून बाहेर आली. तिने थोडा प्रसाद ग्रहण केला. नंतर ती विठ्ठलाच्या दर्शनाला गेली आणि विठ्ठलाकडे पहात तिने तेथेच विठ्ठलाच्या चरणांजवळ प्राण सोडला.
‘गुरुदेवा, माझ्याकडून ही सूत्रे लिहून घेतल्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते.’
– सुश्री रुक्मिणी गुणवंत ठाकूर, खोपटे, उरण, जिल्हा रायगड. (१४.३.२०२६)
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
देश दुर्दशेला पोचण्यामागे हे आहे कारण !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !