हिंदु जनजागृती समितीची निवासी उपजिल्हाधिकार्यांकडे मागणी !

सोलापूर – बहुराष्ट्रीय आस्थापनांमधील व्यावसायिक जिहाद आणि धर्मांतर यांचे षड्यंत्र रोखण्यासाठी ‘लव्ह जिहाद’, ‘धार्मिक दहशत’ आणि ‘धर्मांतराचे जाळे’ यांचे सखोल अन्वेषण करून यातील देशव्यापी साखळी उघड करावी, अशा मागणीचे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांना देण्यात आले. (निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई केव्हा करणार ? – संपादक)
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री देशमुख, कु. भुवनेश्वरी पाटील, तसेच समितीचे सर्वश्री यश मुगड्याल, रोहन गायकवाड, स्वप्नील संगा, प्रेम बाडीवाले, दिनेश जामदार, विनोद रसाळ, संदीप ढगे आदी उपस्थित होते.
सांगली येथेही निवेदन !
वरील विषयाचे निवेदन सांगली येथील निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांना देण्यात आले. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र जनआंदोलनाची चेतावणी देण्यात आली. या वेळी ‘राज्यातील ३०८ मदरशांना संमत केलेले ५० लाख रुपयांचे अनुदान त्वरित थांबवून शासन निर्णय मागे घ्यावा’, अशी मागणीही करण्यात आली. या वेळी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री प्रताप बाणकर, अभिजित कोडग, शुभम होसमठ, विशाल मोहिते, सुनील पांडगावकर, केतन शिंदे, सचिन सूर्यवंशी, गणेश सगरे, उद्योजक श्री. दिगंबर कोरे, हिंदु जनजागृती समितीचे सांगली जिल्हा समन्वयक श्री. संतोष देसाई उपस्थित होते.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज