७० टक्के प्रकरणांमध्ये महिलांकडून घटस्फोटाची मागणी !

बीजिंग – चीनमध्ये घटस्फोटांच्या प्रकरणांत विक्रमी वाढ झाली आहे. घटस्फोटांच्या एकूण घटनांपैकी ७० टक्के प्रकरणांमध्ये महिलांनी घटस्फोटाची मागणी केली आहे. घटस्फोटाच्या वाढत्या प्रवृत्तीच्या मागे महिलांचे आर्थिक स्वतंत्र्य आणि सामाजिक स्वीकृतीतील वाढ, ही मुख्य कारणे आहेत, असे मत समाजशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.
Record increase in divorce cases in China
Women demand divorce in 70 % of cases
Sociologists have expressed the opinion that the main reasons behind the increasing trend of divorce are the economic independence of women and the increase in social acceptance. pic.twitter.com/wu14ooHpNz
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 22, 2026
१. शहरांमध्ये रहाणार्या आधुनिक महिला आता समाजाच्या दबावाखाली जीवन जगण्याऐवजी नात्यातून बाहेर पडण्यासाठी घटस्फोटाचा पर्याय निवडत आहेत.
२. याविषयीच्या एका आकडेवारीनुसार वर्ष २०२५ मध्ये २७ लाखांहून अधिक घटस्फोट नोंदवले गेले. हे वर्ष २०२१ च्या तुलनेत २८ टक्के अधिक आहे.
३. वर्ष १९८० नंतर चीनमध्ये विवाह दरात ऐतिहासिक घट झाली आहे. अविवाहित रहाणे हे नवीन प्रतिष्ठेचे लक्षण बनत आहे. आर्थिक मंदी आणि कौटुंबिक संरचना, याहमध्ये झालेल्या पालटांनी या प्रवृत्तीला आणखी वेग दिला आहे.
४. हा पालट चिनी समाजात पारंपरिक कुटुंब पद्धतीच्या समाप्तीकडे जात असल्याचे दर्शवतो. आता चिनी स्त्रिया स्वतःची वेगळी ओळख आणि आत्मसन्मान यांसाठी घटस्फोटाकडे नवीन सामाजिक अधिकार म्हणून पहात आहेत.
५.चीन सरकारने वर्ष २०२१ मध्ये ३० दिवसांचा ‘कूलिंग-ऑफ पीरियड’ हा नवीन नियम लागू केला. म्हणजेच घटस्फोटाच्या नोंदणीपूर्वी ३० दिवसांची अनिवार्य विचार करण्याची समयमर्यादा ठेवण्यात आली. यामुळे प्रारंभी घटस्फोटांचे प्रमाण घटले; पण नंतर ते पुन्हा वाढले.
६. शांघायमधील कौटुंबिक कायद्याच्या अधिवक्त्या गुई फांगफांग सांगतात, ‘पूर्वी स्त्रिया घटस्फोटासाठी सहसा मोठ्या अत्याचारांचा उल्लेख करत असत. जसे की – घरगुती हिंसाचार, विवाहबाह्य संबंध किंवा जुगारासारख्या सवयी इत्यादी. आता स्त्रिया लग्नाची गुणवत्ता चांगली नाही किंवा आमची मूल्ये जुळत नाहीत आदी कारणे सांगून घटस्फोट मागत आहेत.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !