नोएडा (उत्तरप्रदेश) येथील हिंसाचारागे पाकिस्तान आणि साम्यवादी संघटना यांचा हात !

कामगार संघटनेच्या नावाखाली हिंसाचार भडकवल्याचे उघड

नोएडा (उत्तरप्रदेश) – येथील कामगारांच्या आंदोलनाच्या वेळी झालेल्या हिंसाचारामागे पाकिस्तान आणि साम्यवादी संघटना यांचा हात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, पाकिस्तानमधून चालवण्यात येणार्‍या सामाजिक माध्यमांद्वारे कामगारांना भडकवण्यात आले. हिंसाचार भडकवल्याच्या आरोपावरून पोलिसांनी ‘मजदूर बिगुल दस्ता’ या साम्यवादी संघटनेच्या मनीषा चौहान आणि रुपेश रॉय यांना अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार ‘एक्स’वरील ‘@Proudindiannavi’ आणि ‘@Mir_Ilyas_INC’ या खात्यांवरून नोएडातील आंदोलनासंदर्भात चिथावणीखोर साहित्य प्रसारित करण्यात आले. ही खाती पाकिस्तानमधून चालवली जात होती. या दोन्ही खात्यांविरुद्ध आधीच गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अन्वेषणात असेही आढळून आले की, वरील खात्यांचे संचालक स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न करत होते. तरीही सायबर विभागाने त्यांचे ठिकाण शोधून काढले. या खात्यांद्वारे यापूर्वीही चिथावणीखोर साहित्य प्रसारित करूनन हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

संपादकीय भूमिका

साम्यवादी संघटनांची राष्ट्रघातकी पार्श्वभूमी पहाता अशा सर्व संघटनांवर बंदीच घातली पाहिजे !