सरकारच्या निष्क्रीयतेच्या विरोधात शेतकरी आंदोलन करणार

पेडणे – गोवा-महाराष्ट्र सीमेवर फिरत असलेला ‘ओंकार’ हा जंगली हत्ती पुन्हा गोव्यात आल्याने उत्तर गोव्यातील रहिवासी आणि शेतकरी यांच्यामध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता ग्रामस्थ सरकारच्या निष्क्रीयतेच्या विरोधात आंदोलन करण्याचा विचार करत आहेत. अलीकडेच हा हत्ती तोरसे-मोपा भागात फिरतांना दिसला. या ठिकाणी त्याने काजूच्या लागवडीची हानी केली. उगवे, मोपा आणि तांबोसे येथील ग्रामस्थांनी वन विभागाविरुद्ध तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली असून वारंवार तक्रारी करूनही अशा घटना घडत असल्याने प्रभावी कारवाई झाली नसल्याचा दावा केला आहे. हत्तींना वनक्षेत्रात परत नेण्यासाठी किंवा वसाहती आणि शेतभूमी यांचे संरक्षण करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. या गावांतील स्थानिक लोक आता सरकारकडून तात्काळ हस्तक्षेप, पिकांच्या हानीची भरपाई आणि वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाला तोंड देण्यासाठी शाश्वत योजना यांच्या मागणीसाठी आंदोलनाची योजना आखत आहेत.
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित