शिक्षण विभागाच्या ४८ अधिकार्‍यांना पाठवली नोटीस !

जळगाव जिल्ह्यातील ‘शालार्थ’ घोटाळा !

प्रतिकात्मक छायाचित्र

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील शालार्थ घोटाळ्यात शिक्षण विभागाच्या ४८ अधिकार्‍यांना नाशिक विशेष अन्वेषण पथकाच्या वतीने सुनावणीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. यात जळगावच्या माध्यमिक शिक्षण विभागातील आजी-माजी शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. वर्ष २०२५ मध्ये नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावमध्ये येऊन १० शाळांचे मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांची चौकशी करत महत्त्वाची कागदपत्रे कह्यात घेतली होती. जळगाव जिल्ह्यातील काही शाळांनी कोणतीही पडताळणी न करता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांची भरती केल्याचे अन्वेषणात समोर आले आहे.  बनावट कागदपत्रांच्या आधारे ६०० हून अधिक शिक्षकांसाठी खोटी ओळखपत्रे करून कोट्यवधी रुपयांचे वेतन लाटण्यात आले.

संपादकीय भूमिका

शिक्षण विभागाच्या अंतर्गत फसवणूक करणार्‍यांना सव्याज दंडात्मक वसुलीची शिक्षा द्यायला हवी !