२०० हून अधिक महिलांनी घेतला मार्गदर्शनाचा लाभ !

सांगली, १५ एप्रिल (वार्ता.) – आपण सर्वजण आनंदाच्या शोधात असतो; मात्र सुखाच्या मागे धावल्यामुळे जीवन तणावग्रस्त होते. अध्यात्म हे एक शास्त्र असून त्याप्रमाणे आचरण केल्यामुळेच आपण खर्या अर्थाने आनंदी राहू शकतो. सध्याच्या आपत्काळात साधना आणि नामस्मरण यांविना पर्याय नाही. अध्यात्म ही आनंदी जीवन जगण्याची सुंदर कला आहे, जी शाळा-महाविद्यालयांत शिकवली जात नाही. हे शास्त्र समजून न घेतल्यामुळे समाजात अशोक खरातसारखी भोंदूगिरी निर्माण होऊन सर्वसामान्यांची भगवंतावरील श्रद्धा उडते, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या श्रीमती मधुरा तोफखाने यांनी येथे केले.
‘सांगली सखी मंच’ या महिला मंडळाच्या वतीने चैत्रागोरी हळदी-कुंकवाच्या निमित्ताने ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. या प्रसंगी मंडळाच्या अध्यक्षा सौ. जया जोशी, सनातन संस्थेच्या सौ. सरिता चौगुले आणि परिसरातील २०० हून अधिक महिला उपस्थित होत्या. सौ. जया जोशी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उपस्थित सर्व महिलांनी ‘आम्हाला विषय पुष्कळच आवडला असून परत एकदा तुम्ही आमच्या मंडळात या’, असे सांगितले.
उपस्थित महिलांचे अभिप्राय…
१. सौ. माया खरे – विषयामुळे मनाला पुष्कळ शांती लाभली. अध्यात्माचा खरा अर्थ आज उमजला. ‘हा विषय संपूच नये’, असे वाटत होते.
२. श्रीमती वर्षा कुलकर्णी – अध्यात्म हा प्रांत आपला नाही, असे वाटत होते; परंतु अध्यात्म आणि धर्म यांची व्याख्या स्पष्ट झाल्यामुळे जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोनच पालटला.
३. सौ. रास्ते – प्रवचन ऐकतांना आतून नामजप चालू झाला. प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचे महत्त्व अधिक स्पष्ट झाले.
वैशिष्ट्यपूर्ण
प्रवचन ऐकत असतांना एका महिलेला इतका आनंद मिळाला की, तिने प्रवचन झाल्यावर देवीसाठी आणलेला बकुळीचा गजरा ‘तुम्ही आम्हाला अध्यात्मातील आनंद दिलात’, असे म्हणत श्रीमती तोफखाने यांना दिला.
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !
२९.४.२०२६ या दिवसापासून साधकाला स्वतःच्या आणि सेवेच्या संदर्भात जाणवत असलेले पालट !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या दिव्य भक्तीसत्संगाच्या माध्यमातून साधक अनुभवत असलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची असीम कृपा !