
अंदमान – येथील समुद्रात नौका उलटून झालेल्या अपघातात २५० हून अधिक जण बेपत्ता झाले आहेत. या नौकेतून २८० रोहिंग्या निर्वासित आणि बांगलादेशी नागरिक प्रवास करत होते. यात लहान मुलांचाही समावेश होता. ही नौका ४ एप्रिल या दिवशी दक्षिण बांगलादेशातील टेकनाफ येथून मलेशियाच्या दिशेने निघाली होती. सोसाट्याचा वारा, खवळलेला समुद्र आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी यामुळे अंदमानच्या समुद्रात ही नौका बुडाली, असे संयुक्त राष्ट्रांच्या निवेदनात म्हटले आहे.
परदेशात चांगल्या वेतनाच्या नोकरीचे आमीष आणि अनेकदा तस्करी करणार्या टोळ्यांकडून पसरवली जाणारी चुकीची माहिती यामुळे रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक मोठे धोके पत्करण्यास प्रवृत्त होतात. ही घटना दीर्घकाळ चाललेल्या विस्थापनाचे गंभीर परिणाम दर्शवते, असे संयुक्त राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटना यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले