५ वर्षांपर्यंतचा कारावास होण्याची शक्यता
जकार्ता (इंडोनेशिया) – इंडोनेशियातील बँटन प्रांतात ईशनिंदेचे एक प्रकरण समोर आले आहे. ही घटना चोरीचा आरोप आणि त्यानंतर कुराणावर पाय ठेवून शपथ घेण्याच्या वादाशी संबंधित आहे. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून सर्वत्र प्रसारित झाल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली. पोलिसांनी प्रांतातील लेबक जिल्ह्यात ईशनिंदा कायद्यांतर्गत ही कारवाई करत संबंधित २ महिलांना अटक केली आहे.
🚨 Indonesia: Two women arrested for taking an oath by stepping on the Quran. Reports say they could face up to 5 years in prison.
⚖️ Indonesia acts swiftly when the religious sentiments of its majority are hurt.
🇮🇳 Meanwhile in India, repeated insults to the religious beliefs… pic.twitter.com/SmIdjaN1ZM
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 15, 2026
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ८ एप्रिलला सौंदर्य प्रसाधनगृहाच्या मालकिणीने एका महिला ग्राहकावर चोरीचा आरोप लावला. तिला निष्पापपणा सिद्ध करण्यासाठी कुराणवर पाय ठेवून शपथ घेण्यास सांगितले. या वेळी त्या महिलेने तसे केलेही. मालकिणीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला. तो सामाजिक माध्यमांत प्रसारित झाल्यानंतर इंडोनेशियामध्ये लोकांना संताप अनावर झाला. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही महिलांनी आपला गुन्हा स्वीकारला असून ईशनिंदा कायद्यानुसार जर त्या दोषी आढळल्या, तर त्यांना ५ वर्षांपर्यंतचा कारावास होऊ शकतो.

राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !