Surat Gym Trainer : श्रीमंत विवाहित हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढणार्‍या मुसलमान व्यायाम प्रशिक्षकाला अटक

सूरत (गुजरात) येथील घटना

आरोपी सब्बीर असगर ट्रंकवाला (मध्यभागी)

सूरत (गुजरात) – येथे एका विवाहित हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवणार्‍या मुसलमान व्यायामशाळा प्रशिक्षकाला पोलिसांनी अटक केली. सब्बीर असगर ट्रंकवाला असे त्याचे नाव आहे.

पीडित विवाहित महिला एका प्रतिष्ठित श्रीमंत हिंदु कुटुंबातील आहे. ही महिला  सिटीलाइट भागातील एका व्यायामशाळेत नियमित जात होती. त्या ठिकाणी सब्बीर अजगर ट्रंकवाला हा प्रशिक्षक म्हणून नोकरीला होता. त्याने गोड गोड बोलून महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. सब्बीर मागच्या ७ वर्षांपासून महिलेच्या संपर्कात होता. जेव्हा महिलेच्या पतीला समजले, तेव्हा त्याने सब्बीर याला भेटून पत्नीपासून लांब रहाण्यास सांगितले. यावर सब्बीरने महिलेसमवेतचे काही खासगी छायाचित्र सार्वजनिक करण्याची धमकी देऊन पतीकडे ५ लाख रुपये मागितले, तसेच ठार मारण्याची धमकी दिली. पतीने पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपी सब्बीर याला अटक केली.

चारित्र्याची पडताळणी करून प्रशिक्षक कामाला ठेवा ! – पोलिसांची सूचना

पोलीस उपायुक्त राजदीप सिंह नकुम यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्यांनी व्यायाम प्रशिक्षक आणि संचालक यांची एक बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी सांगितलेली की, तुम्ही ज्यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करता, त्यांच्या चारित्र्याची पडताळणी करा. त्यानंतरच त्यांना कामाला ठेवा.

संपादकीय भूमिका

हिंदूंनो, तुमच्या व्यायामशाळेत हिंदु प्रशिक्षकच नेमा ! तसेच हिंदु तरुणी आणि महिला यांनी  हिंदु प्रशिक्षकच असलेल्याच व्यायाम शाळेत जावे, असे त्यांच्या पालकांनी सांगितले पाहिजे !