इराणची बहरीन, सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिरात आणि जॉर्डन यांच्याकडे मागणी

तेहरान (इराण) – इराणवर आक्रमण करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायल यांना भूभाग वापरण्यास देणार्या बहरीन, सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिरात आणि जॉर्डन या देशांनी हानीभरपाई द्यावी, अशी मागणी इराणने संयुक्त राष्ट्रांकडे केली आहे. या संघर्षात अमेरिकेला साथ देऊन अरब देशांनी चूक केल्याचे इराणने म्हटले आहे.
१. बहरीन, सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिरात आणि जॉर्डन या देशांनी संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस अन् सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष जमाल फारेस अलरोवाई यांना उद्देशून पत्र लिहले होते.
२. यात त्यांनी इराणच्या आक्रमणात झालेल्या त्यांच्या हानीची भरपाईची मागणी केली होती; पण इराणचे राजदूत आणि संयुक्त राष्ट्रांतील इराणचे स्थायी प्रतिनिधी अमीर-सईद इरावानी यांनी हानीभरपाईची मागणी फेटाळून लावली.
३. ‘हे सर्व देश इराणच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांचे कलम ५१ (स्व-संरक्षणाचा अधिकार) कायदेशीररित्या लागू करू शकत नाहीत. या देशांनी अमेरिका-इस्रायल यांच्या आक्रमणाला साहाय्य केले होते’, असे इराणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
४. इराणला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. इराणमधील नागरिकांना लक्ष्य करण्यात आले काही आक्रमणे या देशाकडूनच करण्यात आले.
५. संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, कतार आणि कुवेत या देशांचा भूभाग आणि हवाई क्षेत्र यांचा वापर इराणवर आक्रमण करण्यासाठी झाला. या ५ अरब देशांनी इराणविरोधातील कारवाई त्वरित बंद करावी आणि भूभाग वापरण्यास मज्जाव करावा, अशी मागणी इराणने केली आहे.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman